'पानिपत'कार विश्वास पाटलांवर एसआरए घोटाळ्याचा ठपका !

"निवृत्तीआधी विश्वास पाटील यांनी शेवटच्या महिन्यात 137 प्रकल्पाना घाईत अती वेगवान मंजुरी दिली"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2017 12:43 PM IST

'पानिपत'कार विश्वास पाटलांवर एसआरए घोटाळ्याचा ठपका !

30 नोव्हेंबर : एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत माजी सनदी अधिकारी आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावर चौकशी समितीने ताशेरे ओढले आहे. पाटील यांना विकासकानांना अक्षरशः हव्या तश्या मंजुऱ्या दिल्याचा ठपका याबाबत चौकशी करणाऱ्या समितीने ठेवला आहे.

विश्वास पाटील यांच्यावर एसआरए प्रकरणी अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीने यापूर्वीच पाटील यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यानंतर या समितीला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या समितीने आपल्या अहवालात विश्वास पाटील यांनी जूनमध्ये निवृत्ती आधी घातलेला धुमाकूळ स्पष्टपणे मांडला आहे.

निवृत्तीआधी विश्वास पाटील यांनी शेवटच्या महिन्यात  137 प्रकल्पाना घाईत अती वेगवान मंजुरी दिली, वेगात काम करणं गुन्हा नसला तरी 33 प्रकरणामध्ये पाटलांनी दिलेल्या मंजुरीत स्पष्ट नियमबाह्यतः आढळून आली आहे. त्यापैकी 8 प्रकल्पांना झोपडपट्टी घोषित होण्याआधीच झोपडपट्टी म्हणून पुनर्विकास करण्याची मंजुरी दिली. त्यातील 5 प्रकल्पात खाजगी जमिनीचा समावेश आहे तर एका प्रस्तावात बिल्डरने चक्क सहकारी संस्था असलेल्या जमिनीवर एसआरए योजना राबवण्याची परवानगी मागितली होती.

पाटील आणि सोबतच्या अधिकाऱ्यांनी अटी टाकत या सर्व प्रकल्पांना मंजुरी देऊन टाकली. या आणि अशा प्रकल्पात बिल्डर धार्जिणे धोरण राबवत पाटलांनी काही प्रस्तावाना दाखल झाल्या झाल्या एका दिवसात मंजूर केले. संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांनीही त्या खास प्रकल्पाना अत्यंत तातडीने मंजूर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...