कर्जाची वसूली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या मॅनेजरलाच माजी उपसरपंचाने केली मारहाण

कर्जाची वसूली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या मॅनेजरलाच माजी उपसरपंचाने केली मारहाण

मारहाण झाल्यानंतरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली

  • Share this:

अहमदनगर, १ ऑक्टोबर २०१८- बँकेतून घेतलेल्या कर्जाची वसूली करण्यासाठी घरी आल्याचा राग आल्याने माजी उपसरपंचाने चक्क बँक मॅनेजरलाच मारहाण केलीय. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे मारहाण झाल्यानंतरदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर पोलीस अधिक्षकांनी आदेश दिल्यानंतर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कोळगावचा उपसरपंच मधूकर लगडवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील माजी उपसरपंच मधुकर लगड यांनी इनोव्हा गाडीसाठी २५ लाखांचे कर्ज सेंट्रल बँकेतून घेतले होते. मात्र कर्जाचे पैसे बँकेत न भरल्याने बँकेतून लगड यांना वारंवार फोन करण्यात आले. तरीही लगड यांनी प्रतिसाद न दिल्याने बँकेचे मॅनेजर मंजुनाथ नायक हे वरिष्ठ अधिकार्यांसह कर्ज वसुल करण्यासाठी मधुकर लगड यांच्या घरी गेले. मात्र लगड घरी नसल्याने बँक मॅनेजर यांनी घराचा फोटो काढला.

बँक मॅनेजर घरी का आले असा सवाल करत मधुकर लगड यांनी सुरुवातीला बँक मॅनेजर मंजुनाथ नायक यांना फोनवरुन शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. संध्याकाळी बँक बंद करुन घरी जात असनाता बँक मॅनेजर मंजुनाथ नायक यांना रस्त्यात अडवून मारहाण केली. दरम्याण मारहाण केल्यानंतर नायक यांनी बेलवंडी पोलिस स्टेशन गाठले. मात्र पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप मंजुनाथ नायक यांनी केला.

दरम्यान पोलिसांना तक्रार घेण्यास नकार दिल्याने बँक मॅनेजर मंदुनाथ नायक यांच्यासह बँकेच्या सर्व पदाधिकार्यांनी थेट पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांना निवदेन दिले. अखेर पोलीस अधिक्षकांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बेलवंडी पोलिस ठाण्यात कोळगावचे माजी उपसरपंच मधुकर लगज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या आधी बँक मॅनेजर सोनाली नरवडे यांनीही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली होती अशी तक्रार केली होती.

मात्र पोलिसांनी लेखी तक्रार घेऊनही काहीच कारवाई न केल्याचा आरोप बँक मॅनेजर यांनी केलाय. दरम्यान या संदर्भात बेलवंडी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास साफ नकार दिला. नुकत्याच श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची घटना घडलेली असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा याच तालुक्यात बेलवंडी पोलिसांनी वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

VIDEO: घराला लागलेल्या आगीत 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू

First published: October 1, 2018, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading