अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीला

अटल बिहारी वाजपेयी व्हेंटिलेटवर, 'एम्स' मध्ये सुरू आहेत उपचार, पंतप्रधान भेटीला

  • Share this:

नवी दिल्ली,ता.15 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर आहे.  गेल्या तीन दिवसांपासून त्यांना व्हेटिलेटवर ठेवण्यात आलंय.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी एम्समध्ये जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त बिघडली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गृहमंत्री राजनाथसिंग आणि स्मृती इराणी यांनीही एम्समध्ये जावून डॉक्टरांशी चर्चा केली. वाजपेयींना 11 जून ला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर एम्समध्येच उपचार सुरू आहेत.

94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशिया ने आजारी आहेत. एम्स चे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम वाजपेयी यांच्यावर उपचार करत आहे. या आजारात स्मृती पूर्णपणे जात असल्याने गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी सार्वजनिक जीवनापासून अलिप्त आहेत.

प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्ती घेतली आहे. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं असून कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते आहेत.

 

 

धबधब्यात खूप वेळ एकमेकांना घट्ट पकडलं, पण एक-एक करून पाण्यात गेले वाहून!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2018 07:40 PM IST

ताज्या बातम्या