भागवतांनी मोडली 'ही' संघप्रथा; प्रणवदांनीही दाखवून दिलं, मी तुमचा अतिथी, सेवक नाही!

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2018 10:40 PM IST

भागवतांनी मोडली 'ही' संघप्रथा; प्रणवदांनीही दाखवून दिलं, मी तुमचा अतिथी, सेवक नाही!

नागपूर, 07 जून : वादविवादानंतर अखेर संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रणव मुखर्जी हजर राहिले पण प्रणवदांनी मी प्रमुख अतिथी आहे स्वयंसेवक नाही असं दाखवून दिलं. तर संघाकडून एक प्रथा मोडीत निघाली.

प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत संघाचा तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप सोहळा पार पडला. ज्यावेळी व्यासपीठावर प्रणव मुखर्जी पोहोचले तेव्हा मोहन भागवत यांनी त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन केलं. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही ध्वजप्रणामापासून सुरू होते. आजच्या कार्यक्रमातही ध्वज फडकावण्यात आला यावेळी मोहन भागवत यांच्यासह सर्व स्वयंसेवक छातीजवळ हात घेऊन ध्वज प्रणामासाठी तयार झाले. पण, प्रणव मुखर्जी सावधान मुद्रेतच राहिले. त्यांनी एका प्रकारे मी तुमचा पाहुणा आहे स्वयंसेवक नाही असा संकेत दिला.

Loading...

तर संघप्रथेप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात प्रमुख अतिथीचं भाषण आधी होत असते आणि शेवटला सरसंघचालक भाषण करत असतात.  पण आज  सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणवदांच्या आधी भाषण करून संघाचीच प्रथा मोडीत काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 10:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...