नवाज शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, इस्लामाबादमध्ये का आहे तणाव?

नवाज शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, इस्लामाबादमध्ये का आहे तणाव?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगी मरियमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे

  • Share this:

इस्लामाबाद,ता.6 जुलै : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगी मरियमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर त्यांची मुलं हुसैन आणि हसन यांना फरार घोषीत केलं आहे. शरीफ यांना 73 कोटी तर मरियम यांच्यावर 18 कोटींचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयामुळं पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

भ्रष्टाचाराच्या विविध तीन प्रकरणांमध्ये शरीफ यांना ही शिक्षा सुनावली आहे. शरीफ यांचे जावई कॅप्टन(निवृत्त) मोहम्मद सफदर यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे इस्लमाबादमध्ये तणाव निर्माण झाला असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे आता शरीफ यांना आगामी सार्वत्रिक निवडणूकीत सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर त्यांची मुलगी मरियम यांनाही आता निवडणूक लढता येणार नाही. शरीफ यांचा वारसा मरियम चालवेल असं म्हटलं जात होतं मात्र आता शरीफ यांच्या पक्षाला मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागणार आहे.

हेही वाचा...

'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

'विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी?'

शाळेत विद्यार्थिनीवर 18 जणांचा सामूहिक बलात्कार,शिक्षकही झाले सहभागी

First published: July 6, 2018, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading