पुणे, 03 सप्टेंबर : पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू असं कुटुंब आहे. त्यांच्या जाण्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्यांचेसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसेम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत.
हा तर निव्वळ हलगर्जीपणा! कोरोनाच्या मृत रुग्णांवेळी वापरलेले PPE कीट उघड्यावरच..
नुकतेच त्यांच्यात ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांना कोरोना झालाय हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला पण त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही अखेर त्यांनी ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता. माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले.
जगभरातील सर्व देशांना भारतानं टाकलं मागे, 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद
निधनानंतरही त्यांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published by:Renuka Dhaybar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.