अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, AIIMSने जारी केलं हेल्थ बुलेटिन

अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अद्याप ICU मध्ये ठेवण्यात आलं असल्याचं एम्स जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 07:40 AM IST

अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, AIIMSने जारी केलं हेल्थ बुलेटिन

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना शुक्रवारी AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृदय विकारासंदर्भात तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तात्काळ उपचार केल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्स रुग्णालयाकडू देण्यात आली आहे. अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अद्याप ICU मध्ये ठेवण्यात आलं असल्याचं एम्स जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात येऊन जेटली यांची भेट घेतली. जेटली यांच्यावर किडनी संदर्भातील आजारावर उपचार सुरू होते. आतापर्यंत कधीच त्यांच्या आजारपणाबद्दल माहिती दिलेली नाही. जेटली यांच्यावर सप्टेंबर 2014मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMSमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तर त्याआधी त्यांच्या हृदयचे ऑपरेशन झाले होते.

Loading...

मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून मंत्रिपदासाठी आपला विचार करू नये अशी विनंती केली होती. या पत्रात त्यांनी गेल्या 18 महिन्यांपासून प्रकृती खराब असल्याचे म्हटले होते. प्रकृती ठिक नसल्यामुळे आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात आपल्या नावाचा विचार करू नये असे त्यांनी म्हटले होते.

जेटली 2000पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लंटची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा ते जवळ जवळ 100 दिवस अर्थ मंत्रालयात आले नव्हते. या काळात पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

AIIMSचे मेडिकल बुलेटिन

जेटली यांच्या प्रकृतीसंदर्भात एम्स रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आले आहे. अरुण जेटली यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेटली यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

SPECIAL REPORT: बोटी नेत्यांसाठी आहेत की बचावकार्यासाठी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 07:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...