पुढच्या यात्रेला निघतोय...CBI च्या माजी संचालकांनी सुसाईड नोट लिहून दिला जीव

पुढच्या यात्रेला निघतोय...CBI च्या माजी संचालकांनी सुसाईड नोट लिहून दिला जीव

टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अश्वनी कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?

  • Share this:

शिमला, 08 ऑक्टोबर : नॅगालँडचे माजी राज्यपाल आणि CBI चे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान पोलिसांना अश्वनी कुमार यांच्या घरात गळफास घेतलेल्या ठिकाणी सुसाईड नोट सापडली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?

आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. गंभीर आजारामुळे मी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी घरातील किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला जबाबाद धरू नये असं अश्वनी यांनी म्हटलं आहे. मी माझ्या इच्छेनं हे जीवन संपवत आहे आणि पुढच्या प्रवासाला निघत असल्याचा उल्लेखही त्यांनी या सुसाईड नोटमध्ये केला आहे.

हे वाचा-आता चीनची खैर नाही; मोठी किंमत चुकवावी लागेल, डोनाल्ड ट्रम्प संतापले

सीबीआयचे माजी संचालक असलेले अश्विनी कुमार हे नागालँड मणीपूरचे माजी राज्यपालही होते. दरम्यान अश्विनी कुमार यांची सुसाइड नोटही मिळाली आहे. कुटुंबावर ओझं बनायचं नाही, असं या सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. मागच्या काही काळापासून अश्विनी कुमार डिप्रेशनमध्ये होते. अश्विनी कुमार हे हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालकही होते. ऑगस्ट 2006 ते जुलै 2008 या कालावधीमध्ये त्यांनी महासंचलक पद भुषवलं. तर ऑगस्ट 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात त्यांनी सीबीआय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 8, 2020, 8:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या