आउटगोईंग बंद इनकमिंग सुरू, राष्ट्रवादीच्या खेळीनं भाजपला बसला धक्का!

आउटगोईंग बंद इनकमिंग सुरू, राष्ट्रवादीच्या खेळीनं भाजपला बसला धक्का!

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकत सेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. याच जोरदार इनकमिंगमध्ये भाजपच्या एका आमदाराने भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत.

  • Share this:

नागपूर, 10 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांआधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकत सेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. याच जोरदार इनकमिंगमध्ये भाजपच्या एका आमदाराने भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. नागपुर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. घोडमारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेटही घेतली असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

घोडमारे 2009 मध्ये हिंगणा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारून समीर मेघेंना उमेदवारी दिली होती. तेव्हापासून घोडमारे नाराज होते. पुन्हा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं ते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येत असतानाच राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - शरद पवारांवरील टीकेवर सुप्रिया सुळे म्हणतात, अपना नाना...!

विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात अनेक धक्के बसले. त्यानंतर आता विदर्भातही राष्ट्रवादीतून आऊटगोईंग सुरू झालं आणि आता दक्षिणी महाराष्ट्रातही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपक आबा साळुंखे यांनी राजीनामा दिला आहे. सांगोल्याचे माजी आमदार दिलीप आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

इतर बातम्या - शरद पवार दैवत पण..., आणखी एक राष्ट्रवादी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

'मला सांगोला इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. तशी मी पक्षाला मागणी सुध्दा केली. मला उमेदवारी देऊन पक्ष मला न्याय देईल ही अपेक्षा ठेवत आहे. पण मतदारसंघातील काम आणि जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचं काम या दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करणं शक्य नसल्यानं मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे' असं कारण दिलीप आबा साळुंखे यांनी दिलं. 'शरद पवार हे आमचे दैवत आहेत' असंही ते यावेळी म्हणाले. शरद पवारांवर प्रेम असलं तरी आता दिलीप आबा साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत

महाराष्ट्रात सोमवारी आणखी एका पुतण्याची बंडखोरी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या तोंडावर सुनील तटकरेंचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे रायगडात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

इतर बातम्या- झीरो डिग्री बारमध्ये लहान मुला-मुलींचा धिंगाणा, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा

'गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्षबदलाबाबत चर्चा सुरू होती. अजितदादा पवार यांच्याशी एकदा चर्चा झाली होती. माझ्या व्यथा मी त्यांच्याकडे मांडल्या होत्या. पण मी पक्षबदलाच्या निर्णयापर्यंत पोहचलो होतो. मी कोणावरही नाराज नाही. राजकीय महत्वकांक्षा काहीशी आहेच. मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. तर काकांशी पक्षबदलाबाबत काहीही बोलणं झालेलं नाही.' अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी दिली आहे.

SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या