मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीचा वरदहस्त; परदेशी चलनाचा साठा 8 अब्ज डॉलर्सने वाढला !

दिवाळीच्या मुहूर्तावर लक्ष्मीचा वरदहस्त; परदेशी चलनाचा साठा 8 अब्ज डॉलर्सने वाढला !

दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक गोष्ट घडली आहे. परकीय चलन साठ्यामध्ये (Foreign Exchange Reserves) 8 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 14 नोव्हेंबर: दिवाळीच्या मुहूर्तावर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच परकीय चलनाची (Foreign Exchange Reserves) आकडेवारी जाहीर झाली आहे. 6 नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये देशाकडे तब्बल 568.49 अब्ज डॉलर्स इतकं परदेशी चलन आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. परदेशी चलनाचा साठा 8 अब्ज डॉलर्सने वाढला  आहे. 30 ऑक्टोबर रोजीच्या आठवड्यामध्ये देशाकडे परदेशी गुंतवणुकीमध्ये 18.3 डॉलर्सची वाढ झाली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) याबाबत माहिती दिली आहे. परकीय चलन म्हणजे फॉरेन करन्सीमध्ये वाढ झाल्यामुळे आपल्या देशाला अनेक फायदे होणार आहेत. दर आठवड्याला हे आकडे मोजले जातात. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे मंदीचं वातावरण असतानाही देशामध्ये परदेशी चलन वाढणं ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब आहे. परदेशी चलनामध्ये सलग दुसऱ्या महिन्यात घसशीत वाढ झाली आहे. आकडे काय सांगतात? आरबीआयच्या माहितीनुसार, परकीय मालमत्ता चलनामध्ये (Foreign Currency Assets)  7.779 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. परकीय चलन डॉलरमध्ये मोजलं जातं. त्यामध्ये युरो, पाऊंड, येन यासारख्या इतर परकीय चलनांचीही मोजमाप असते. जगभरात डॉलरच्या माध्यमातून व्यवहार केले जातात. परकीय चलन वाढल्यामुळे आता आपला देश जास्त आयात करू शकतो. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील सुवर्ण भांडारामध्ये (Gold Reserves) 1.328 अब्जाची वाढ झाली आहे. त्यामुळे सुवर्ण भांडार 37.587 अब्ज डॉलरवर गेला. हे आकडे नक्कीच सकारात्मक आहेत.
First published:

Tags: Economy

पुढील बातम्या