मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; 18 कोटींच्या कोकीनलह ड्रग स्मगलरला ठोकल्या बेड्या

ट्रॉली बॅगच्या पोकळीत लपवून आणलं मोठ्या प्रमाणात कोकीन...

ट्रॉली बॅगच्या पोकळीत लपवून आणलं मोठ्या प्रमाणात कोकीन...

  • Share this:
    मुंबई, 25 नोव्हेंबर: मुंबईत बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन मोठ्या प्रमाणात समोर येत असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ( Narcotics Control Bureau) धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) बुधवारी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. एक ड्रग स्मगलर (Drug Smuggler) अटक करण्यात आलं आहे. आरोपीकडून 18 कोटी रुपये किंमतीचं कोकीन देखील हस्तहत करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मूसा असून तो पश्चिम आफ्रिकेतील देश गिनी येथील रहिवासी आहे. तो ड्रग स्मगलर आहे. आरोपी दुबईहून मुंबईत आला आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. ट्रॉली बॅगच्या पोकळीत हे कोकीन लपवून आणलं होतं. हेही वाचा... भिवंडीत तणाव! मोबाईलचं आमिष दाखवून नराधमानं अल्पवयीन मुलीच्या अब्रुचे तोडले लचके महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांना याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार दुबईहून मुंबईत आलेल्या मूसा याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ड्रग स्मगलर मूसाकडून 2 किलो 935 ग्रॅम कोकीन जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकीनची किंमत 18 कोटी रुपयांच्या घरात आहे. दरम्यान, डीआरआरच्या अधिकाऱ्यांची एका आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या 10 दिवसांपूर्वी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडे चार किलो कोकीन जप्त केली होती. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात 27 कोटी रुपये मुल्य होतं. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका आठवड्यात मुंबईत ही दुसरी कारवाई आहे. याचा अर्थ असा की, मुंबईत कोकीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे डीआरआयनं आता ड्रग नेक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी रणनीती आखली आहे. दरम्यान,  शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकात (New Delhi Railway Station) 840 विदेशी बियरच्या कॅनची तस्करी केल्याच्या आरोपाखाली 49 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोकीनसह एका विदेश महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने रविवारी दिल्ली विमानतळावरून परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. प्रवाशाकडून जप्त करण्यात आलेल्या कोकीनची किंमत जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं कस्टम विभागाकडून सांगण्यात आलं आहे. विदेशी प्रवासी, टांझानियाच्या अदिस अबाबाहून दिल्लीकडे येत असल्याची माहिती आहे. कस्टम विभागाकडून त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त (रेल्वे) हरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं की, शनिवारी संशयास्पद हालचालींमुळे एका महिलेला थांबवण्यात आलं आणि तिच्याकडे असलेल्या ज्यूटच्या 12 बॅगची तपासणी करण्यात आली. त्या बॅगमध्ये बीयरचे 840 कॅन होते. महिला ट्रेनमधून, मुंबईहून दिल्लीत आली होती. तिच्याकडचे बीयरचे कॅन बेकायदेशीरपणे देशात आणले गेले आणि त्यानंतर मुंबईहून दिल्लीत विक्रीसाठी आणले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा...VIDEO:वांद्रे स्टेशनवर तोबा गर्दी! कोरोना टेस्ट न करता मुंबईत पोहोचल 780 प्रवाशी मरियम एनी एडाकवो असं अटक करण्यात आलेल्या विवाहित महिलेचं नाव असून तिला तीन मुलं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती नायजेरियाई पोलीस दलात आहे आणि ही महिला 2011 पासून भारतात येते. ती कपड्यांच्या व्यवसायासंदर्भात फेब्रुवारीमध्ये भारतात आली होती. ती मुंबईत राहत होती. तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बीयर अफ्रिकी लोकांमध्ये लोकप्रिय असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: