Ford Aspireचं ब्लू व्हर्जन लाँच; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

पेट्रोल आणि डीझल असे दोन व्हेरिएंट

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 10:27 PM IST

Ford Aspireचं ब्लू व्हर्जन लाँच; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली, 10 मे : फोर्ड इंडिया (Ford India) ने आपली कॉम्पॅक्ट सेडान कार अस्पायर Ford Aspire चं ब्लू व्हर्जन भारतात लाँच केलं. या गाडीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 7.40 लाख रुपये आहे. तर डीझल इंजिन व्हेरिएंट 8.20 लाख रुपये आहे. फोर्ड अस्पायर ब्लू स्टाईल ही जास्त शक्तिशाली नंबर वन कार असल्याचं फोर्ड इंडियाचे विपणन अधिकारी विनय रैना सांगतात. या मॉडेलवर 5 वर्षांची वॉरंटी असल्याचं त्यांनी सांगितलं.


फोर्ड फिगोसारखे ब्लू कलरचे इंसर्ट आणि फिनिशिंगसाठी अलाइव व्हील देण्यात आले आहेत. कारच्या केबिनमध्येसुद्धा ब्लू कलरचा इफेक्ट देण्यात आला आहे. गाडीच्या डोअरवरसुदधा ब्लू कलर इंसर्ट, आसनांवर ब्लू कलर च्या थ्रेडने शिलाई आणि बॅकरेस्टवर ब्लू बॅजिंग देण्यात आलं आहे.


गुगल सांगतं - भारतीय लोक लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक

Loading...


इंजिन - अस्पायरच्या 1.2 पेट्रोल व्हर्जनमध्ये बसवण्यात आलेलं इंजिन 96 पीएसची पावर आणि 120 एनएम चा टॉर्क जनरेट करतं. तर 1.5-लीटर डीझल इंजिन 100 पीएस ची पावर आणि 215 एनएम चा टॉर्क जनरेट करतं.


फीचर्स - अस्पायरच्या ब्लू व्हेरिएंटमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन इम्फोटेनमेंट सिस्टिम लावण्यात आलं आहे. यावरून हा अदाज लावता येईल की, अस्पायर ब्लूमधले फीचर्स टॉप व्हेरिएंट (टायटेनियम प्लस)सारखे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...