मुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केलं प्रवृत्त; माहेरच्यांनी नवऱ्याच्या घरासमोरच जाळला विवाहितेचा मृतदेह

मुलगा होत नसल्यानं आत्महत्येस केलं प्रवृत्त; माहेरच्यांनी नवऱ्याच्या घरासमोरच जाळला विवाहितेचा मृतदेह

Suicide in Junnar: मुलगा होत नसल्यानं सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide with Child) केली आहे.

  • Share this:

जुन्नर, 11 जून: मुलगा होत नसल्यानं दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी, यासाठी एका विवाहितेला मारहाण करत तिचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेनं आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide with Child) केली आहे. संबंधित घटना जुन्नर (Junnar) तालुक्यातील नारायणगाव परिसरात घडली आहे. ही आत्महत्या नसून खून करून तिला विहिरीत टाकलं असल्याची तक्रार विवाहितेच्या आई-वडिलांनी केली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. यानंतर माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह नवऱ्याच्या घरासमोरचं जाळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव रंजना तांबे असून 15 एप्रिल 2009 रोजी तिचं नारायणगाव येथील अविनाश बंडू तांबे (वय-31) याच्याशी लग्न झालं होतं. विवाह झाल्यानंतर तिच्या आरोपी नवरा अविनाशने तीन वर्षे तिला चांगली वागणूक दिली. पण त्यानंतर नवऱ्याने मृत रंजनाला त्रास द्यायला सुरुवात केली. रंजना यांना दोन्ही मुलीच झाल्याने सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. शिवाय विवाहितेला आजारी पडल्यानंतरही माहेरी पाठवलं जात नव्हतं.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृत रंजना यांना नवरा, दीर, सासू आणि सासरे काम करत नाही, म्हणून वारंवार त्रास देऊन मारहाण आणि शिवीगाळ करत होते. रंजना गरोदर असतानाही अवजड कामं करायला लावली जात होती. त्यामुळे विवाहितेचा एकदा गर्भपातही झाला होता. अशात रंजना यांना दोन मुली झाल्याने दोन वर्षांपूर्वी आरोपी नवऱ्यानं दुसरं  लग्न करायचं ठरवलं होतं.

हे ही वाचा-आजारी वडिलांचं झालं ओझं; उरुळी कांचनमध्ये मद्यपी मुलानं ब्लेडनं चिरला गळा

आरोपी नवऱ्याला मुलगा हवा होता, त्यामुळे त्याने दुसऱ्या लग्नाची तयारी केली होती. परंतु रंजना यांनी नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केला त्यामुळे तिला 8 जून 2021 रोजी मारहाण करण्यात आली. त्यामुळे मानसिक दबावाखाली आलेल्या विवाहितेनं 9 जून 2021 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह शिवहरीनगर येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यानंतर संतप्त झालेल्या माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह नवऱ्याच्या घरासमोरचं जाळला. याप्रकरणी माहेरच्यांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 11, 2021, 3:26 PM IST

ताज्या बातम्या