PHOTOS: रावणाचा पुतळा बनवण्यासाठी स्वत:ची संपत्ती विकणारा अवलीया!

  • Share this:

हरियाणातल्या पंचकुला इथं दसऱ्यासाठी महाकाय रावणाचा पुतळा उभारण्यात आलाय. प्रचंड असा हा पुतळा इथलं आकर्षणाचं केंद्र ठरलाय. देशभरातून लोक हा रावण बघण्यासाठी येत आहेत. लोक पुतळ्यासोबत सेल्फी घेतायत आणि हा पुतळा निर्माण करणारे कलाकार तेजेंद्र राणाचही कौतुक करताहेत. (सर्व फोटो-चमन लाल पलानिया)

रावणाचा हा पुतळा बनवणारे कलाकार तेजेंद्रराणा चौहान यांची कहाणीही रोचक आहे. अंबालातल्या बराडा इथं राहणारे राणा हे कुणाचीही आर्थिक मदत न घेता गेली 31 वर्ष अशाच प्रकारचा पुतळा बराडा इथं तयार करत होते. पण यावर्षी त्यांना तिथलं मैदान मिळू शकलं नाही. त्यामुळं त्यांनी पंचकुला इथं रावण तयार करण्याचा निर्णय घेतला.

राणा यांना रावणाचा पुतळा बनवण्याचं वेडच आहे. त्यासाठी त्यांनी आपली 12 एकर जमीनही विकून टाकलीय. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी लाखो रूपये खर्च केलेत. अजुनही त्यांचं हे वेड कायम आहे.

राणांच्या या छंदाला त्यांच्या कुटुंबियांचीही पूर्ण साथ आहे. त्यांना राणांची आवड माहित असल्यानं ते त्यात कुठलीही आडकाठी न आणता त्यांना प्रोत्साहन देत असतात. आपण कष्टानं तयार केलेला पुतळा पाहून लोकांना जो आनंद मिळतो तीच आपली खरी कमाई असल्याची प्रतिक्रीया राणांनी व्यक्त केली.

सध्याच्या युगात प्रत्येक जण हा आपल्या आनंदासाठी जगतो. आणि जास्तित जास्त पैसा कसा मिळवता येईल याकडेच त्याचं लक्ष असंत. मात्र आपल्या जवळचं सर्वच देवूनही ते दुसऱ्यांच्या आनंदामुळे स्वत:ही आनंदी आहेत.

तेजेंद्र राणा यांच्या कुटूंबियांना त्यांच्या या वेडाची आता सवय झालीय. पहिल्यांदा जेव्हा रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती तेव्हा त्यांनी आपली जमीन विकण्याचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयाला त्यांची पत्नी मंजू आणि मुलगा दिलवर यानं विरोध केला. पण तेजेंद्र यांचं वेड एवढं होतं की त्यांना त्यांच्या हट्टापुढे माघार घ्यावी लागली.

त्यानंतर कुटूंबियांनी त्यांच्या या कामाला कधीच विरोध केला नाही. तर नेहमी प्रोत्साहनच दिलं. त्यांनी जेव्हा आपल्या कमाईचा पैसा या गोष्टीत लावण्याचं ठरवलं त्या वेळी त्यांनी कायम तेजेंद्र यांना मदत केली. नंतरही अनेकदा त्यांनी आपली जमीन विकून रावणाचा पुतळा घडवला.

तेजेंद्र यांनी आपली सर्व कमाई रावणाचा जगातला सगळ्यात उंच पुतळा तयार करण्यात लावली. दसरा उत्सवाचं आयोजन भव्य प्रमाणात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आता राहिलेली सर्व संपत्ती त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने केलीय. आपला जीमचा व्यवसाय आणि शेतीही त्यांनी मुलाच्या नावाने केलीय. कुठली संस्था जर मदतीसाठी पुढं आली तर कुतूब मीनार पेक्षाही मोठा रावणाचा पुतळा तयार करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आपली ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशी आशा त्यांना आहे

First published: October 18, 2018, 7:15 PM IST

ताज्या बातम्या