रुग्णालयात जयललिता यांच्या जेवणाचा खर्च होता 1.17 कोटी, 75 दिवसांचं बिल झालं 6 कोटी

रुग्णालयात जयललिता यांच्या जेवणाचा खर्च होता 1.17 कोटी, 75 दिवसांचं बिल झालं 6 कोटी

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या 2016ला अपोलो रुग्णालयात 75 दिवस उपचारासाठी होत्या. या 75 दिवसांचा खर्च तब्बल 6.85 कोटी रुपये इतका आला आहे.

  • Share this:

तमिळनाडू, 19 डिसेंबर : दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या 2016ला अपोलो रुग्णालयात 75 दिवस उपचारासाठी होत्या. या 75 दिवसांचा खर्च तब्बल 6.85 कोटी रुपये इतका आला आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या एका समितीने नुकताच हा खुलासा केला आहे जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या समितीने दिलेल्या माहितीनुसार, एकूण बिल 6 कोटी 85 लाख रुपयांचं आहे तर या रक्कमेतील 44.56 लाख रुपयांची थकबाकी आहे. 5 डिसेंबर 2016ला जयललिता यांचं निधन झालं. त्यानंतर काही महिन्यांनी 15 जून 2017 ला सत्ताधारी एआयईएडीएमके द्वारा 6 कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2016ला रुग्णालयाला 41.13 लाख रुपये देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हे बिल लिक होण्यासंदर्भात विचारलं असता या प्रकरणात जस्टिस अरुमुगस्वामी कमिशन आणि रुग्णालयाचे वकील या दोघांनी यावर बोलण्यास टाळलं. पण जे बिल 27 नोव्हेंबर 2018ला समितीकडे जमा करण्यात आलं ते बिल खरं असल्याचं वकीलांकडून सांगण्यात आलं आहे.

या बिलामध्ये 'फूड एंड बिवरेज सर्विस'साठी 1 कोटी 17 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला असल्याचं लिहण्यात आलं आहे. यात जयललिता यांना भेटायला येणाऱ्या लोकांचा समावेश असल्याचंही म्हटलं आहे.

दुसरा खर्च म्हणजे 'कंसल्टेशन फी' जी 71 लाख रुपये आहे. युकेच्या एका डॉक्टर रिचर्ड बेलला 92 लाख रुपये, सिंगापूरच्या एका रुग्णालयात 1 कोटी 29 लाख रुपये देण्यात आले आहेत. बिलानुसार, रुग्णालयातील खोलीचा खर्च 1 कोटी 24 लाख रुपये आहे ज्यात जयललिता यांची देखरेख करणाऱ्या लोकांचा पगारही नमूद करण्यात आला आहे.

75 दिवसांपर्यंत सुरू असलेल्या या उपचारानंतर 5 डिसेंबर 2016ला जयललिता यांचं निधन झालं. सप्टेंबर 2017ला राज्य सरकारने एक समिती नेमली जी जयललिता यांच्या निधनाचा तपास करेल.

VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र

First published: December 19, 2018, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading