तगड्या मानधनसाठी 'या' 5 स्टार्सनी नाकारले सिनेमे

आतापर्यंत अनेकांनी तारखांमुळे आणि स्क्रीप्ट न आवडल्यामुळे सिनेमांना नकार दिला. पण या पाच सेलिब्रिटींनी त्यांना मनासारखे मानधन दिले नाही म्हणून सिनेमे नाकारले.

  • Share this:

या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं. दबंगच्या यशानंतर सोनाक्षीला किक सिनेमात काम करण्याची संधी मिळत होती. मात्र, तिने मानधन जास्त मागितलं. यानंतर निर्माते साजिद नाडियाडवालाने सोनाक्षीऐवजी जॅकलीन फर्नांडिसची निवड केली.

यात बॉलिवूडचा बादशहा शाहरुखचं नाव नाही घेतलं तर कसं चालेल. ज्या पद्धतीने स्टारचं स्टारडम असतं त्यानुसारच त्यांचं मानधन ठरतं. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या सिनेमासाठी शाहरुखला विचारलं होतं. मात्र शाहरुखने जास्त मानधन मागितल्यामुळे अखेर संजय यांना शाहरुखला नकार द्यावा लागला होता.

८० च्या दशकापासून आजपर्यंत चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनेही सिनेमांसाठी तगडं मानधन मागितलं होतं. पण तेवढं देण्यास निर्मात्यांनी नकार दिल्यामुळे माधुरीने सिनेमांना नकार दिला होता.

जॉली एलएलबी २ सिनेमासाठी सुरुवातीला नवाजुद्दीन सिद्दीकीला विचारण्यात आले होते. मात्र त्याने आपले मानधन वाढवून सांगितल्यामुळे निर्मात्यांनी त्याला न घेण्याचा निर्णय घेतला.

आर. माधवनचं नावही या यादीत आहे. फन्ने खां सिनेमासाठी ऐश्वर्या रायच्या अपोझिट सुरुवातीला त्याच्या नावाची विचारणा झाली होती. मात्र माधवननेही इतर कलाकारांप्रमाणे मानधन वाढवून मागितल्यामुळे त्याच्याऐवजी राजकुमार रावचा विचार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या