पावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग!

गावात पिण्याचे पाणी नाही, राशन नाही, शेतात गुरांना चारा नाही, पाणी नाही. वर्षभर पाऊस नसल्याने कसलाच चारा नाही.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 09:46 PM IST

पावसासाठी शेतकऱ्याचा 'बजरंगबली'समोरच अन्नत्याग!

बीड 25 ऑगस्ट : पावसाळ्याचे दोन महिने निघून गेले पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येतंय की काय म्हणून दुष्काळामुळे हतबल झाल्याने एका शेतकऱ्याने तीन दिवसांपासून अन्नत्याग करत गावातील मारुती मंदिरासमोर ठाण मांडलंय. पाऊस पाडावा म्हणून मारुती समोरच धरणे धरलं आहे. देवा आत्ता तूच सोडव या दुष्काळाच्या संकटातून असें म्हणत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतील शेपवाडी येथील शेतकरी उत्तम भानुदास शेप यांनी अन्नत्याग केलाय.

उत्तमराव यांच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. अंबाजोगाई तालुक्यावर गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाचे भीषण सावट आहे. यावर्षी तर दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. खरीप पेरणी वाया गेली. रब्बीचा तर पेराच झाला नाही. यावर्षीही पावसाळा संपत आला तरी पाऊस नाही. यार्षीही पुन्हा पेरणी नाही. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

गावात पिण्याचे पाणी नाही, राशन नाही, शेतात गुरांना चारा नाही, पाणी नाही. वर्षभर पाऊस नसल्याने कसलाच चारा नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती नसतानाही त्यांना पाच हजार रुपये टनदराने चारा खरेदी करावा लागतोय. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ लागलाय. या स्थितीकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. गुरांचे व माणसांचे बेहाल सहन होत नसल्याने बजरंगबलीचे निसिम्म भक्त ऊत्तमरावांनी श्रद्धेपोटी अन्नत्याग करून हनुमान मंदिरात ठाण मांडून बसले आहेत.आज तिसऱ्या दिवशी ही ते मंदिरात बसून आहेत. ग्रामस्थांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसून पाऊस आल्याशीवाय मंदिरातून जाणार नाही असा निश्चयच त्यांनी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला, कोल्हापूरातल्या महापूराने प्रचंड नुकसान झालं. विर्भात किमान पाऊस पडला. मात्र मराठवाड्यात पावसाने दडीच मारलीय. गेल्या महिनाभरापासून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नाहीये. त्यामुळे पीकं करपून गेली. जनावरांचेही चाऱ्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे जगायचं कसा असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...