Tik tokवर व्हिडिओ करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, तुमच्यावर आहे पोलिसांचं लक्ष

Tik tokवर व्हिडिओ करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा, तुमच्यावर आहे पोलिसांचं लक्ष

टिकटॉकवर व्हिडिओ करा पण ते टीपटॉप करा, इतकीच काय ती अपेक्षा आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 20 डिसेंबर : Tik tokवर टिंगल-टवाळक्या करणाऱ्यांनो  आता जरा सावधान. कारण सहज मजा म्हणून केलेले तुमचे व्हिडिओ केवळ तुमचे फॅन्सच बघणार नाहीत तर आता  त्यावर पोलीसही नजर ठेवून असणार आहेत. त्यामुळे तुमचा व्हिडिओ जर आक्षेपार्ह आढळला तर  तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागणार.

ते झालं असं की, Tik tokचा व्हिडीओ बनवताना मागून पोलिसांची गाडी आली अन् तिन्ही तरुणांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. पिंपरी चिंचवडच्या एम्पायर इस्टेट पुलावर मनोरंजनासाठी केलेला धिंगाणा थेट पोलीस स्टेशनच्या पायरीपर्यंत गेला.

फेसबुक, इंस्टाग्राम प्रमाणेच टिकटॉक अॅप्लिकेशनने तरुण-तरुणींना अक्षरशः वेड लावलं आहे. टिकटॉकवर अकाउंट उघडून तरुण-तरुणी डंबिंग व्हिडिओ तयार करतात. यावर लाईक्स अन कमेंट्सचा भडीमार होतोय. तेच व्हिडिओ मित्रांच्या व्हाटअॅप-फेसबुकच्या स्टेट्सवर झळकतात, व्हायरलही होतात.

त्यामुळंच हे फॅड दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. मात्र आता याचे विपरीत परिणाम होत असल्याचं लक्षात आल्याने अनेकजण tiktokला रामरामही ठोकतायत.

तुम्हाला विश्वास नाही बसणार पण, खर्चासाठी पैसे देत नसल्याने टिकटॉक व्हिडिओचा आधार घेत पत्नीने पतीला कॅन्सर झाल्याची अफवा मित्रांमध्ये पसरवली. टिकटॉकवरील हीच बदनामी जिव्हारी लागल्याने पतीने आत्महत्या केल्याचं प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच घडलं.

याची पुनरावृत्ती होऊ नये आणि आपण गंमत म्हणून केलेल्या एखाद्या व्हिडिओमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी आता थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सोशल मीडियावर कोणी कसे व्हिडिओ बनवायचे याचं स्वातंत्र असलं तरी यातून कोणाची बदनामी करण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. त्यातूनही तुम्ही असं काही केलंच तर पोलीस तुम्हाला बेड्या ठोकतील. तेव्हा टिकटॉक करा पण ते टीपटॉप करा, इतकीच काय ती अपेक्षा आहे.

First published: December 20, 2018, 4:48 PM IST

ताज्या बातम्या