अल्पवयीन मुलीने केला प्रेमात कहर, प्रियकराला गाडी आणि मोबाईल देण्यासाठी असा केला प्रताप

अल्पवयीन मुलीने केला प्रेमात कहर, प्रियकराला गाडी आणि मोबाईल देण्यासाठी असा केला प्रताप

प्रेम प्रकरणांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पण याहूनही अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.

  • Share this:

नाशिक, 17 जून : प्रेमात काहीही होऊ शकतं याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. प्रेम प्रकरणांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पण याहूनही अजब प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. प्रेमासाठी एका अल्पवयीन मुलीनं घरातच चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षाच्या मुलीने मित्रासाठी नातेवाईकांचे सहा लाख 59 हजारांचे दागिने लंपास केले.

प्रियकरला मोबाईल आणि गाडी घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे आपल्या प्रेमासाठी तिने भावाच्याच घरातून पैसे चोरल्याचं समोर आलं आहे. मुंबई नाका पोलिसांनी नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत तिचा 20 वर्षीय मित्र दिप भालेरावलाही अटक केली आहे.

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि झडती घेतली असता दिपकडून 6 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. आताची तरूणाई चुकीच्या मार्गाने चालत असल्याचं यावरून समोर येतं. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं आणि त्यांच्यावर योग्य ते संस्कार करणं महत्त्वाचं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर तिच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. खरंतर प्रेमात लोक काय करतील याचा नेम नाही. पण त्यासाठी आपल्या कुटुंबाचा असा विश्वासघात करणं योग्य नाही. हल्लीच्या तरुणांच्या या वागण्यामुळे पालकांमध्येही चिंतेचं वातावरण आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 17, 2020, 6:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या