S M L

पिंपरीत आश्रमातल्या खिचडीतून झाली 30 मुलींना विषबाधा !

पिंपरीच्या तळेगाव दाभाडेतील प्रेरणा रेनबो या अनाथाश्रमामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Updated On: Sep 4, 2018 04:32 PM IST

पिंपरीत आश्रमातल्या खिचडीतून झाली 30 मुलींना विषबाधा !

पिंपरी चिंचवड, 04 सप्टेंबर : पिंपरीच्या तळेगाव दाभाडेतील प्रेरणा रेनबो या अनाथाश्रमामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  प्रेरणा रेनबो अनाथाश्रमातील मुलींना रात्रीच्या जेवनातुन विषबाधा झाली आहे. खिचड़ी खाल्यानंतर आश्रमातील 30 मुलींना उलटी, मळमळ तसेच चक्कर येण्याचा प्रकार घडला आहे. यानंतर या 30 मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर 30 मुलींपैकी 19 मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तर इतर 11 मुलींवर अद्याप उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी रुग्णालयात जाऊनही या मुलींची चौकशी केली तर खिचडी खाल्यानंतर त्यांना हा त्रास झाला असल्याचं सांगण्यात आलं.

यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढच्या तपासासाठी पोलिसांनी खिचडी तपासणीसाठी पाठवली आहे. तर ही खिचडी कोणी बनवली आणि त्यात कोणत्या पदार्थांचा वापर करण्यात आला याचा आता पोलीस तपास करत आहेत.

सुदैवाने या विषबाधेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण खिचडीतून विषबाधा झाल्याने संपूर्ण परिसरात आणि आश्रमात खळबळ उडाली आहे.

 

Loading...
Loading...

'ही' व्यक्ती करण जोहरच्या मेसेजवर ठेवते नजर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2018 04:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close