साखरेचा 30 लाख टनांचा बफर स्टॉक, 20 हजार कोटींची थकीतं मिळणार ?

साखरेचा 30 लाख टनांचा बफर स्टॉक, 20 हजार कोटींची थकीतं मिळणार ?

यानुसार कारखान्यांकडील साखर ३० ते ३२ रुपये किलोच्या दरानं विकली जाणार आहे. तर 30 ते 32 लाख टनांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णयही होणार आहे.

  • Share this:

मुंबई,ता.24 मे: केंद्रीय खाद्य मंत्रालयानं साखरेच्या दराचा प्रश्न सुटण्यासाठी एक नोट तयार केलीय. लवकरच त्यावर निर्णय होणार आहे. यानुसार कारखान्यांकडील साखर ३० ते ३२

रुपये किलोच्या दरानं विकली जाणार आहे.

या साखरेचा ३० लाख टनांचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर मोठी तयारी सुरु आहे. साखरेचे भाव सध्या २५ ते २६ रुपये किलोपर्यंत खाली घरसले आहेत, त्यामुळं कारखान्यांना शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीची रक्कम देणं अवघड जातंय.

त्यावर पर्याय म्हणून ३० ते ३२ रुपये किलोच्या दरानं साखर खरेदी होणार आहे. आणि यातल्या किमान ३० लाख टनांचा बफर स्टॉक झाल्यावर साखरेचे घसरलेले दर जाग्यावर येतील अशी अपेक्षा सरकारी सूत्रांनी वर्तवलीय.

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहीलेल्या पत्रानंतर केंद्रीय कॅबिनेटनं ही नोट तयार केलीय. सध्या उसाचे थकीत २० हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं हा उपाय करण्यास सुरुवात केलीय.

साखर गोड होणार?

  • केंद्रीय खाद्य मंत्रालयाची नोट
  • कारखान्याकडील साखरेची खरेदी होणार
  • सरासरी 30 ते 32 रु. किलोच्या दरानं होणार खरेदी
  • केंद्र सरकार करणार 30 लाख टनांचा बफर स्टॉक
  • शरद पवारांच्या पत्रानंतर केंद्र सरकारची हालचाल
  • देशात उसाचे 20 हजार कोटी रुपये थकीत

First published: May 24, 2018, 8:09 PM IST

ताज्या बातम्या