• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यात रानगव्यांची दहशत, आठ गव्यांचा कळप फिरतोय मानवी वस्तीत, पाहा VIDEO

पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यात रानगव्यांची दहशत, आठ गव्यांचा कळप फिरतोय मानवी वस्तीत, पाहा VIDEO

पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातही रानगव्यांच्या मानवी वस्तीतील फेऱ्यांमुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.

  • Share this:
कोल्हापूर, 3 जानेवारी : पुण्यात (Pune) शिरलेला रानगवा, त्याचे व्हिडीओ आणि त्याला पकडण्यासाठी झालेल्या खटपटीत रानगव्याचा झालेला दुर्देवी मृत्यू... याबाबत तुम्ही ऐकले असेलच. त्यानंतरही आणखी एका रानगव्याचे दर्शन पुणेकरांना नुकतेच झाले होते. पुण्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिल्ह्यातही रानगव्यांच्या मानवी वस्तीतील फेऱ्यांमुळे जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. आजरा तालुक्यात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ रानगव्यांचा कळप मानवी वस्त्यांमध्ये फिरताना दिसतो आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये तब्बल चार वेळा या आठ रानगव्यांच्या कळपाने मानवी वस्तीत हजेरी लावली. आजरा आणि परिसरातील तालुक्यांमध्ये असलेल्या जंगलांमध्ये अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा हे प्राणी शेतांच्या भागात फिरतात आणि पिकांचे अतोनात नुकसान करतात. या रानगव्यांच्या कळपाकडूनही ऊसासह अनेक पिकांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. तब्बल आठ गव्यांचा कळप फिरतानाचा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. रस्त्यावर फिरणारे हे रानगवे पाहिल्यानंतर कुणाच्याही मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आजरा तालुक्यातील फिरणाऱ्या या कळपाचा व्हिडीओ आहे.  ( Kolhapur district there is a panic of wild cows) वाढते शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मानवी वस्त्यांमध्ये  जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. जंगल परिसराला लागून असलेल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये हे प्राणी सावज , पाण्याच्या शोधात येत असल्याचे दिसते आहे. जंगली प्राण्यांच्या शहरी भागातील वाढत्या वावरामुळे मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील सहजीवनाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: