Home /News /news /

उपाय सापडला! आता कांदा चिरताना डोळ्यांतून कधीच येणार नाही पाणी; फक्त फॉलो करा 'या' टिप्स

उपाय सापडला! आता कांदा चिरताना डोळ्यांतून कधीच येणार नाही पाणी; फक्त फॉलो करा 'या' टिप्स

अशा पद्धतीनं एका क्षणात थांबेल डोळ्यातील पाणी

अशा पद्धतीनं एका क्षणात थांबेल डोळ्यातील पाणी

कांदा चिरायचं म्हटलं की आधीच तोंडचं पाणी पळतं. कारण कांदा चिरताना डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात.

    मुंबई, 08 डिसेंबर: कांदा (Onion) हा स्वयंपाकघरातला महत्त्वाचा घटक. कांद्याशिवाय जेवणाला चव नाही. कांदा हा अनेक भाज्या किंवा आमटीतला महत्त्वाचा घटक असतो. सॅलडमध्येही कांद्याचा वापर केला जातो. कांदा आरोग्यासाठीही लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. कांद्याचे पदार्थ बहुतांश जणांना आवडतात; पण कांदा चिरायचं म्हटलं की आधीच तोंडचं पाणी पळतं. कारण कांदा चिरताना डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात. तुम्ही स्वतः कांदा चिरत असाल किंवा जवळच इतर कुणी कांदा चिरत असेल, तर त्याचा त्रास होतोच. इतर भाज्या चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही. मग कांद्यामध्ये असं काय आहे, ज्यामुळे डोळ्यांतून पाणी येतं, असा प्रश्न (Why Onion Makes Us Cry) अनेकांना पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे कांदा चिरताना हॉटेलमधले शेफ किंवा स्वयंपाकी यांच्या डोळ्यातून पाणी वाहत नसल्याचंही तुमच्या कधी ना कधी दृष्टीस पडलं असेल. असं का होतं, याची माहिती घेऊ या. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. कांद्यामध्ये असलेल्या विशिष्ट रसायनामुळे कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येतं. सायन प्रॉपेंथियल-एस-ऑक्साइड नावाचं (Syn Propanethial S Oxide) रसायन कांद्यामध्ये असतं. कांदा चिरल्यानंतर हे रसायन डोळ्यांमधल्या अश्रू ग्रंथीला उत्तेजित करतं आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येतं. आरोग्यासाठी आवळा आहे बहुगुणी; मात्र अशा लोकांनी जपूनच खाणं ठरेल फायदेशीर कांद्याच्या दरांमुळे कांदा बऱ्याचदा रडवतो; पण तो चिरताना रडू येऊ द्यायचं नसेल, तर काही उपाय करता येऊ शकतात. कांदा चिरताना अतिशय धारदार चाकू वापरण्याचा सल्ला शेफ विन्‍सेंट ओलिवरी यांनी दिला आहे. कांदा कापताना अश्रू येऊ नयेत, असं वाटत असेल, तर त्यासाठी कांदा कापण्याची पद्धत बदलावी लागेल. त्यासाठी कांद्यावरची नको असलेली साल काढून टाका. त्यानंतर कांद्याचा वरचा भाग कापून तो 15 ते 20 मिनिटं पाण्यात ठेवा. यामुळे कांद्यातलं सल्फ्युरिक कंपाउंड बाहेर पडतं आणि कांदा कापताना डोळे चुरचुरत नाहीत, पाणीसुद्धा येत नाही. याच पद्धतीचा अवलंब अनेक शेफ करतात. कांदा पाण्यात ठेवल्याने त्याचा स्वाद कमी होतो, असंही काही जण मानतात. कांदा कापण्यापूर्वी 15 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवला, तरीही त्यातलं रसायन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डोळ्यांतून पाणी येत नाही. कांदा कापताना पंखा चालू केला, तरीही फायदा होऊ शकतो. पंख्यामुळे हवा खेळती राहते आणि कांद्यातलं रसायन थेट डोळ्यांत जात नाही.
    First published:

    पुढील बातम्या