चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, 3 जानेवारीला सुनावणार शिक्षा

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, 3 जानेवारीला सुनावणार शिक्षा

बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय.

  • Share this:

23 डिसेंबर, रांची : बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी  राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय.  स्पेशल सीबीआय कोर्टाने आपला निर्णय देत या प्रकरणात सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.  तसंच माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचीही निर्दोष सुटका करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. आता पुढील महिन्यात 3 जानेवारीला लालूंना शिक्षा सुनावली जाणार आहे.

2जी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनाही चारा घोटाळ्यातून सुटण्याची आशा निर्माण झाली. पण लालूप्रसाद यांच्या आशांवर 'चारा' पडलाय. स्पेशल सीबीआय कोर्टाने लालूंना दणका दिलाय. 1991-1994 या काळात 85 लाखांचा चारा घोटाळा झाला होता. या चारा घोटाळ्याच्या दुसऱ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालू प्रसाद वगळता इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाने लालूप्रसाद यादव यांची 1990 च्या नंतरची संपत्तीही जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

चारा घोटाळा नेमकं प्रकरण काय ?

चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.

लालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्रीपद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलीही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.

आज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार?

देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 03:50 PM IST

ताज्या बातम्या