वाहतूक कोंडीवर नवा पर्याय, लवकरच येणार उडणाऱ्या कार

वाहतूक कोंडीवर नवा पर्याय, लवकरच येणार उडणाऱ्या कार

बऱ्याच वेळा शहरात ट्रॅफिकच्या गदारोळात अडकलं की तिथून उडतउडत आपली सुटका करून घ्यावीशी वाटते. सध्या तरी असं कोणतंही उडणारं वाहन आपल्याकडे नाही.पण भविष्यात मात्र अशा उडणाऱ्या कार आपल्या सेवेसाठी दाखल होऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : बऱ्याच वेळा शहरात ट्रॅफिकच्या गदारोळात अडकलं की तिथून उडतउडत आपली सुटका करून घ्यावीशी वाटते. सध्या तरी असं कोणतंही उडणारं वाहन आपल्याकडे नाही.पण भविष्यात मात्र अशा उडणाऱ्या कार आपल्या सेवेसाठी दाखल होऊ शकतात.

पोर्श आणि बोइंग या कार कंपन्यांनी अशा उडणाऱ्या कारवर संशोधन सुरू केलं आहे. या दोन्ही कंपन्यांनी एक सामंजस्य करार केला आहे. या उडणाऱ्या कार शहरात कशा पद्धतीने काम करतील यावर या कंपन्या संशोधन करतायत.

वाहतुकीच्या गर्दीत कमी जागा असल्यामुळे या कार कमी जागेत टेक ऑफ आणि लँडिंग करू शकतील का याबदद्लच्या चाचण्या कराव्या लागतील.

अशा प्रकारच्या कार बनवणं सोपं नाही. यावर सखोल संशोधन करावं लागणार आहे. शहरात ये - जा करणाऱ्या सगळ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे या कार जास्तीत जास्त निर्धोक बनवण्यावर संशोधकांचा भर असणार आहे.

(हेही वाचा : सणासुदीच्या दिवसांत सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर)

प्रिमियम फ्लाइंग कार्स तयार करायच्या असतील तर त्यासाठी नवी व्यवस्था निर्माण करावी लागेल.  पोर्श कंपनीने 2018 मध्ये याबद्दल एक सर्व्हे केला होता. फ्लाइंग व्हेइकल्स म्हणजेच उडणाऱ्या वाहनांना 2025 नंतर चांगलीच मागणी असेल, असं या सर्व्हेमध्ये समोर आलं. त्या वेळेपर्यंत अशा कार बनवण्यासाठी कमी खर्च येईल आणि हे तंत्रज्ञान लोकांना परवडू शकेल, असंही या कंपन्यांचं म्हणणं आहे.

======================================================================================

राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या