Xiaomiचे 'हे' स्मार्टफोन आज खरेदी केले तर मिळतील 'या' ऑफर

Xiaomiचे 'हे' स्मार्टफोन आज खरेदी केले तर मिळतील 'या' ऑफर

Flipkart Big Shopping Days Saleचा आज शेवटचा दिवस; Xiaomiच्या स्मार्टफोन्सवर भारी सूट

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मे :  Flipkart Big Shopping Days Sale चा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इतर बरेच प्रोडक्ट्स अत्यंत कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येतील. Xiaomi च्या स्मार्टफोन्सवरसुद्धा या सेलमध्ये भारी सुरू दिली जात आहे. जाणून घ्या Xiaomiच्या कोणत्या फोनवर किती सूट दिली जात आहे.

Redmi 6 - फ्लिपकार्ट सेलमध्ये रेडमी 6 वर 1,000 रुपयांची सुट दिली जात आहे. या फोनचे दोन व्हेरिएंट आहेत. 3जीबी 32 जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची मुळ किंमत 7,999 रुपये आहे. मात्र हा फोन तुम्हाला फक्त 6,999 रुपयात खरेदी करता येईल. 3 जीबी 64 जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची मुळ किंमत 8,499 रुपये आहे तो तुम्हाला 7,499 रुपयांत खरेदी करता येईल.

मायक्रोएसडी कार्डच्या विश्वातही क्रांती; 'या' कंपनीने लाँच केलं 1TB मेमरी कार्ड

Redmi Note 6 Pro - रेडमी नोट 6 प्रो च्या 6 जीबी64 जीबी स्टोअरेज या व्हेरिएंटवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंटमुळे हा फोन तुम्हाला 13,999 रुपयांत खरेदी करता येईल. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 1,000 रुपये आणखी अतिरिक्त कॅशबॅक तुम्हाला मिळवता येईल.

Mi A2 - या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 1,000 रुपयांचं डिस्काउंट दिलं जात आहे. यातलं 6 जीबी 128 जीबी स्टोअरेज व्हेरिएंट खरेदी करताना तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा घेता येईल. यावर तुम्हाला 2,000 रुपये कॅशबॅक मिळतील. Mi A2 च्या 4 जीबी 64 जीबी स्टोअरेज हे व्हेरिएंट डिस्काउंट नंतर तुम्हाला 10,999 रुपयांत खरेदी करता येईल. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 1000 रुपये कॅशबॅक मिळतील.

Oppoच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48MP चा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Poco F1 - या स्मार्टफोनचं 6 जीबी 64 जीबी स्टोएरेज व्हेरिएंट खरेदी करताना एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 2000 रुपयांची कॅशबॅक मिळेल. तर 8 जीबी 256 जीबी स्टोएरेज या व्हेरिएंटवर 3,000 रुपयांची सूट मिळेल. या व्हेरिएंची मुळ किंमत 27,999 रुपये आहे. पण तो तुम्हाला या सेलमध्ये फक्त 24,999 रुपयांत खरेदी करता येईल.

Redmi Note 5 Pro - रेडमी नोट 5 प्रो चं 4 जीबी64 जीबी स्टोअरेज आणि 6 जीबी64 जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरिएंट आहेत. ज्यांवर तुम्ही 2,000 रुपये डिस्काउंट मिळवू शकता. 4 जीबी64 जीबी स्टोअरेजच्या व्हेरिएंटची मुळ किंमत 12,999 रुपये आहे, तो तुम्हाला 10,999 रुपयांत खरेदी करता येईल आणि 6 जीबी64 जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची मुळ किंमत 13,999 रुपये आहे ते तुम्हाला 11,999 रुपयांत खरेदी करता येईल.

Redmi Y2 - या सेलमध्ये Redmi Y2 4GB64GB स्टोअरेज हे व्हेरिएंट ज्याची मुळ किंमत 13,499 रुपये आहे ते तुम्हाला 9,999 रुपयांत खरेदी करता येईल. तर 3GB32GB स्टोअरेज हे व्हेरिएंट 7,999 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल.

First published: May 19, 2019, 10:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading