Flipkart वर Big Shopping Days Sale सुरू; बम्पर डिस्काउंटमुळे अर्ध्या किमतीत मिळतील 'या' वस्तू

Flipcartच्या या महासेलमध्ये 80 टक्क्यांपर्यंत भारी सूट

News18 Lokmat | Updated On: May 15, 2019 05:36 PM IST

Flipkart वर Big Shopping Days Sale सुरू; बम्पर डिस्काउंटमुळे अर्ध्या किमतीत मिळतील 'या' वस्तू

नवी दिल्ली, 15 मे : Flipkart Big Shopping Days Sale ला 15 मे पासून सुरूवात झाली. 19 मे पर्यंत चालणाऱ्याया सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह वेगवेगळे गॅजेट्स, स्मार्टफोन, होम फर्निचर आणि कपड्यांवर मिळत असलेल्या बंपर डिस्काउंटचा तुम्हाला फायदा घेता येईल. फ्लिपकार्ट प्लसच्या मेंबर्ससाठी हा महासेल 14 मे रोजी रात्री 8 वाजताच सुरू झाला. जाणून घ्या कोणत्या वस्तूंवर किंती सूट मिळत आहे.


स्वस्तात खरेदी करा स्मार्टफोन - मोबाइल आणि टॅबलेट कॅटेगिरीमध्ये आत्तापर्यंतची सर्वात जास्त सूट दिली जात आहे. 4GB RAM 64 GB स्टोअरेचा Samsung Galaxy J6 हा स्मार्टफोन फक्त 9,490 रुपयांत तुम्हाला खरेदी करता येईल. Redmi Note 7 चा 4GB RAM 64 GB स्टोअरेज व्हेरिएंट असलेला स्मार्टफोन तुम्हाला 11,999 रुपयांत खरेदी करता येईल. तर Nokia 6.1 Plus हा स्मार्टफोन खरदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 12,999 रुपये मोजावे लागतील.Loading...

उद्यापासून सुरू होतोय OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चा ऑनलाइन सेल; इथे मिळेल ऑफरफॅशन प्रोडक्टवर भारी सूट - फ्लिपकार्टच्या या महासेलमध्ये 1000 पेक्षाही जास्त ब्रँडेड प्रोडक्टवर 50 ते 80% टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टने या बंपर डिस्काउंटची वेगवेगळी कॅटेगिरी तयार केली आहे. ज्यात 80 टक्के, 70 टक्के, 60 टक्के आणि 50 ट्क्के अशा ऑफर आहेत. महिलांसाठीच्या ब्रँडेड वस्तू, जशा वेरो मोडा, ओनली, AND यांवर 50 टक्के सूट दिली जात आहे जी टॉप, ड्रेस, जीन्स इ. वर आहे. अॅलनसॉली, स्केचर्स, स्पार्क्स यांसारख्या ब्रँडेड वस्तूंवर 70 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तर फास्टट्रॅक, टायटन आणि कॅसिओ सारख्या ब्रँडेड घड्याळांवर 80 ट्क्क्यांपर्यंत सूट मिळत आहे.


होम अप्लायंसेसवर भारी सूट - फ्लिपकार्टच्या या महासेलमध्ये टीवी, वॉशिंग मशीन, AC, पंखे, कुलर, फ्रिज वरसुद्धा बंपर डिस्काउंट मिळत आहे. 'थॉम्सन'चा (4HD) FHD स्मार्ट टीवी 16,999 रुपयांत खरेदी करता येईल. तर Samsung चा 55 इंचाचा टीवी तुम्हाला 59,499 रुपयांत खरेदी करता येईल. 'सिम्फनी'चा फॅन आणि कुलरवर 55 टक्के डिस्काउंट मिळेल.


इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी - जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करावयाच्या असतील तर यापेक्षा उत्तम संधी तुम्हाला मिळणार नाही. JBL, सोनी यांसह अनेक ब्रँडेड हेडफोन्सवर 60 टक्के डिस्काउंटवर तुम्हाला खरेदी करता येतील. DSLR आणि मिररलेस कॅमेऱ्याची किंमत 20,000 रुपयांपेक्षाही कमी आहे. Core i5 थिन आणि लाइट लॅपटॉपची किंमत 29,930 रुपयांपासू सुरू होते.


10 टक्के अतिरिक्त सूट - फ्लिपकार्टच्या या माहासेलमधून वस्तू खरेदी करताना तुम्ही जा पेमेंटसाठी HDFC क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरलं तर तुम्हाला आणखी 10 टक्के सूट मिळणार आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Flipkart
First Published: May 15, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...