नवी दिल्ली, 16 मे : Flipkart चा Big Shopping Days Sale मध्ये स्मार्टफोच्या विक्रीवर भारी डिस्काउंटवर दिला जात आहे. 15 मे पासून सुरू झालेला हा सेल 19 मे पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Nokia चे स्मार्टफोनवरसुद्धा बंम्पर डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे शॉपिंग करताना नोकियाचा स्मार्टफोन तुम्हाला फोन अर्ध्या किमतीत खरेदी करता येईल.
Flipkart च्या या सेलमध्ये HDFC बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त विशेष सूट दिली जात आहे. या सेलमधून नोकियाचा कोणत्या फोनवर किती डिस्काउंट दिला जात आहे याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
लिनोवोचा 'हा' फोल्डेबल स्क्रीन लॅपटॉप घडवणार क्रांती; 'ही' आहेत वैशिष्ट्य
Nokia 6.1 Plus
HMD ग्लोबल चा Nokia 6.1 Plus या स्मार्टफोनची मुळ किंमत 17,600 रुपये आहे. पण फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला हा फोन फक्त 12,999 रुपयांत खरेदी करता येईल. यासठी कंपनीने एक्सचेंज ऑफर सुद्धा जाहीर केली आहे. ज्यामुळ तम्ही हा फोन फक्त 12,100 रुपयांत खरेदी करू शकाल. Axis Bank Buzz क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के सूट दिली जात आहे.
Nokia 5.1 Plus
या सेलमध्ये ग्राहकांना Nokia 5.1 Plus हा स्मार्टफोन 7,999 रुपयात खरेदी करता येईल. याआधीसुद्धा कंपनीने या स्मार्टफोनच्या दरात कपात केली होती. त्यानंतर हा फोन 10,599 रुपयाला विकला जात आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये कंपनीने या फोनवर आणखी 2,600 रुपयांची सूट जाहीर केली आहे. लाँचिंगच्या वेळेस कंपनीने या फोनची किंमत 10,999 रुपये ठेवली होती. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेणाऱ्यांना हा फोन 7,350 रुपयांत खरेदी करता येईल.
Motorolaच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48 मेगापिक्सलचा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत
Nokia 6.1 Plus चे फीचर्स -
या फोनचा 5.8 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. नोकियाच्या इतर फोन्सप्रमाणेच नोकिया 6.1 प्लससुद्धा अँड्रॉइड वन सीरीज चा एक भाग असून, तो अँड्रॉइड 8.1 ओरियोवर काम करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर देण्यात आलं आहे. 16 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5 मेगापिक्सल सेकंडरी रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Nokia 5.1 Plus चे फीचर्स -
नोकियाने या स्मार्टफोनमध्ये हायब्रिड सिम स्लॉट आणि 5.86 इंचाचा नॉच डिस्प्ले दिला आहे. तसंच ऑक्टा-कोर मीडिया टेक हीलियो पी60 प्रोसेसर दिलं आहे. या फोनमध्ये 135 मेगापिक्सलचा ड्युएल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फी प्रमींसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पावरसाठी यात 3060 mAh ची बॅटरी बसवण्यात आली आहे.