S M L

कोल्हापूरसह पाच शहरातून मुंबईसाठी विमानसेवा फक्त अडीच हजारात

केंद्र सरकारनं उडान योजनेच्या अंतर्गत मुंबई ते कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, नांदेड अशा पाच शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली

Sachin Salve | Updated On: Mar 30, 2017 04:47 PM IST

कोल्हापूरसह पाच शहरातून मुंबईसाठी विमानसेवा फक्त अडीच हजारात

30 मार्च : तुम्ही सोलापूर, कोल्हापूरवरून मुंबईला येत असाल आणि रस्त्यात खूप ट्रॅफिक लागत असेल तर आता विमानानं प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झालाय.

केंद्र सरकारनं उडान योजनेच्या अंतर्गत मुंबई ते कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, नांदेड अशा पाच शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केलीय. विशेष म्हणजे त्यासाठी अवघे अडीच हजार रूपयेच मोजावे लागणार आहेत.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री गजपती राजू यांनी आज (गुरुवारी) दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केलीय. मुंबईला पोहोचण्यासाठी जिथं फक्त तासभर लागतो तिथं ही सेवा सध्या सुरु करण्यात आलीय. सप्टेंबरमध्ये ही सेवा सुरू होईल. दुसऱ्या टप्यात आणखी इतर शहरांचा यात समावेश केला जाणार आहे. तसंच अडीच हजार रूपये तिकीट असलेल्या पन्नास टक्के जागा प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.

असा असेल विमान प्रवास

- नांदेड - मुंबई ऑगस्टपासून

- कांडला - मुंबई ऑगस्टपासून

- पोरबंदर - मुंबई सप्टेंबरपासून

- नाशिक (ओझर)- मुंबई

- नाशिक (ओझर)- पुणे सप्टेंबरपासून

- कोल्हापूर-मुंबई सप्टेंबरपासून

- जळगाव-मुंबई सप्टेंबरपासून

- सोलापूर-मुंबई सप्टेंबरपासून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2017 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close