बाप रे! रन-वे सोडून हायवेर उतरलं विमान, VIDEO VIRAL

बाप रे! रन-वे सोडून हायवेर उतरलं विमान, VIDEO VIRAL

या विमानात दोन इंजिंनपैकी एकात अचानक बिघाड झाल्यानं रस्त्यावर लँण्डिंग करावं लागलं असं तपासात समोर आलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 23 मे : महामार्गावर वेगानं गाड्या जाताना अनेकदा पाहिल्या असतील पण अशा वेगवानं धावत्या गाड्यांमध्ये अचानक महामार्गावर विमान लँण्ड केल्याचं कधी पाहिलं आहे का? रिकाम्या रस्त्यांवर विमान आपत्कालीन परिस्थितीमध्ये उतरवण्यात आल्याच्या अनेक घटना आपल्याला माहिती आहेत पण अचनाक रस्त्यावर धावणाऱ्या दोन कारच्या बाजुलाच हे लँण्डिंग करण्याची वेळ पायलटवर आली आहे.

अमेरिकेच्या कनसास शहरात मिसुरी महामार्गावरील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. पिवळ्या रंगाचं लहान विमान महामार्गाच्या दिशेनं लँण्ड होत असल्याचं पाहायला मिळालं. ही संपूर्ण घटना मागच्या कारमधील एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली. या व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे.

हे वाचा-जगात वेगाने पसरतोय आणखी एक व्हायरस, विद्या बालननं सांगितलं कसं वाढतं संक्रमण

विमान महामार्गावर उतरल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला. या विमानात दोन इंजिंनपैकी एकात अचानक बिघाड झाल्यानं रस्त्यावर लँण्डिंग करावं लागलं असं तपासात समोर आलं आहे.

मसुरी हायवे स्टेट पेट्रोलिंग पोलिसांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. ह्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता I-470 महामार्गावर धावणाऱ्या कारच्या मध्ये इमर्जन्सी लँण्डिग करावं लागलं. विमान उतरत असल्याचं पाहून कारनं वेग कमी केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. वैमानिकानी विमान सुरक्षितपणे हायवेवर उतरवल्यानं कोणतंही नुकसान झालं नाही.

हे वाचा-VIDEO: चुकीच्या पद्धतीनं सिगार ओढणं पडलं महागात, अशी झाली उर्वशी रौतेलाची अवस्था

संपादन- क्रांती कानेटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 02:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading