Home /News /news /

स्टेट बँकेची खास सुविधा; ATM मधून काढता येणार Fixed Deposit

स्टेट बँकेची खास सुविधा; ATM मधून काढता येणार Fixed Deposit

आता बँकांनी इंटरनेट बँकिंग,मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून घरबसल्या सर्व व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केल्यानं बँकेत न जाताही मुदत ठेवीसह अन्य ठेवयोजनांमध्ये घरबसल्या गुंतवणूक करता येते.

    मुंबई 8 मे: सर्वसामान्य लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेतील फिक्स्डडिपॉझिटअर्थात मुदतठेवींना (Fixed Deposit) नेहमीच प्राधान्य देतात. अगदी काही दिवसांच्या मुदतीपासून ते काही वर्षांच्या मुदतीपर्यंत यात रक्कम गुंतवता येते. गुंतवणूकीसाठी(Investment)सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. याला विम्याचे संरक्षण असते तसेच वेळप्रसंगी मुदतीआधी ही गुंतवणूक काढून घेता येते. ही योजना शेअरबाजाराशी (Stock Market)संबधित नसते त्यामुळं शेअर बाजारातील चढ-उतारांचा परिणाम होत नाही.आता बँकांनी इंटरनेट बँकिंग,मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून घरबसल्या सर्व व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध केल्यानं बँकेत न जाताही मुदत ठेवीसह अन्य ठेवयोजनांमध्ये घरबसल्या गुंतवणूक करता येते. झीबीझ डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय स्टेट बँकेनं यात आणखी एक पाऊल पुढं टाकलं असून, बँकेनं मुदत ठेवीचे पैसे जेव्हा पाहिजे तेव्हा काढता येतीलआणि तेही एटीएममधून (ATM)अशी एक खास योजना दाखल केली आहे. मल्टी ऑप्शन डिपॉझिट योजना (Multi Option Deposit Scheme) असं या योजनेचं नाव आहे. एरवी मुदत ठेव योजनेतील पैसे मुदती आधी काढायचे म्हटलं तर बँकेत जाऊन अर्ज दयावा लागतो, मग पैसे मिळतात.   किमानदहा हजार गुंतवणूक : यामल्टी ऑप्शन डिपॉझिट (MOD) योजनेत एक हजार रुपयांच्यापटीमध्ये पैसे जमाकरतायेतातआणितसेचएक हजार रुपयांच्यापटीतपैसेकाढताही येतात.या योजनेवर स्टेट बँकेच्या इतर मुदत ठेवीइतकेचव्याज मिळते. किमानदहा हजार रुपये गुंतवून तुम्ही हेखाते उघडू शकता. खाते उघडल्यानंतरत्यातएक हजार रुपयांच्यापटीतपैसे जमा करू शकता.या योजनेत कमाल गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. योजनेतील पैसे एटीएममधून काढू शकता: मल्टी ऑप्शन डिपॉझिट (MOD) योजनेद्वारे एटीएममधून पैसेकाढण्याचीही सुविधा मिळते.कारण ही योजनाग्राहकाच्याचालू(Current Account)किंवा बचत खात्याशी(Savings Account)जोडलेलीअसते. ग्राहक जेव्हाया योजनेतून काही पैसे काढताततेव्हात्यांच्याखात्यातजीकाही शिल्लक आहे त्यावर व्याजाचा लाभ दिलाजातो. मुदतीपूर्वीच यातील सर्व रक्कम काढायची असेल तरीदेखीलबँकेत जाण्याची गरज नाही.घरबसल्या हे काम करता येते आणिएटीएममधूनया योजनेतील आपले सर्व पैसे काढता येतात.सध्याच्या काळात तर या योजनेमुळे ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. वेळप्रसंगी ते मुदत ठेवीतील पैसे अगदी सहज आणि तत्काळएटीएममधूनकाढू शकतात. ही खरचं खूप मोठी सोय आहे.
    First published:

    Tags: ATM, Technology

    पुढील बातम्या