S M L

कारमध्ये गुदमरून चाकणमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

खेळण्यासाठी कारमध्ये गेलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकणमध्ये घडलीय. दुपारी खेळत असताना करण खेळण्यासाठी पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये गेला आणि कार लॉक झाली.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 3, 2018 03:29 PM IST

कारमध्ये गुदमरून चाकणमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

पिंपरी चिंचवड, 03 एप्रिल : खेळण्यासाठी कारमध्ये गेलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकणमध्ये घडलीय. चाकणमध्ये खराबवाडी परिसरात करणचं घरं आहे, दुपारी खेळत असताना करण खेळण्यासाठी पार्किंगमध्ये असलेल्या कारमध्ये गेला आणि कार लॉक झाली. कार लॉक झाल्यानं त्याला बाहेर पडता येईना आणि काचा बंद असल्यानं करणचा आवजही बाहेर येत नव्हता. त्यात भर म्हणजे बाहेर तापमान वाढलेलं असल्यानं कारही चांगलीच तापली होती. करणची बाहेर पडण्याची धडपड व्यर्थ ठरली आणि करणचा गुदमरून अंत झाला. खेळायला गलेला करण घरी आला नसल्यानं पालकांनी त्याचा शोध घेतला तेव्हा कारमध्ये करण बेशुद्धावस्थेत आढळून आला. करणला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित गेले. ही कार कुणाची होती, कार का लॉक करण्यात आली नव्हती? कार कुणाच्या मालकीची होती याचा तपास आता चाकण पोलिस करत आहेत. मुलांना बाहेर खेळताना बाहेर पाठवताना पालकांनी जास्त काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

 

five year old boy died tuesday when he was struck in car at chakan

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2018 03:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close