UPSC : या 5 कारणांमुळे विद्यार्थी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत

UPSC : या 5 कारणांमुळे विद्यार्थी IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत

संघ लोक सेवा आयोग ( UPSC ) 2 जून 2019 रोजी सिव्हिल सेवा प्रारंभिक परीक्षा देशभर आयोजित करतेय.

  • Share this:

मुंबई, 27 मे : युपीएससी सिव्हिल एक्झाम (CSE )ला IAS परीक्षाही म्हणतात. संघ लोक सेवा आयोग ( UPSC ) 2 जून  2019 रोजी सिव्हिल सेवा प्रारंभिक परीक्षा देशभर आयोजित करतेय. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी देशभरातले असंख्य तरुण आयुष्यातली अनेक वर्ष या परीक्षेच्या तयारीत घालवतात. पण उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण 0.2% आहे. म्हणजे 1000मध्ये 2 व्यक्ती. जाणून घेऊ याची कारणं -

महिन्याला खर्च 28.50 रुपये आणि विमा 4 लाख रुपये, सरकारच्या योजनेचा 'असा' घ्या फायदा

वाईट प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी, मॅनेजमेंटसाठी कमी वेळ

IAS परीक्षा उत्तीर्ण न होण्याचं मोठं कारण म्हणजे प्लॅनिंगची कमतरता. उमेदवाराकडे संपूर्ण सिलॅबसचा अभ्यास करण्याची योजना हवी. योग्य रणनीती आणि व्यवस्थित दृष्टिकोनाशिवाय परीक्षा उत्तीर्ण होणं कठीण आहे. शिवाय वेळेचं नियोजन नसणं हेही अपयशाचं एक कारण आहे.

55 रुपये जमा केलेत तर मिळेल दर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन, असं करा रजिस्ट्रेशन

स्पष्टतेची कमतरता

काही UPSC उमेदवारांकडे CSEमध्ये अभ्यास करायची स्पष्टता कमी असते. उमेदवारांना परीक्षेसाठी कुठली पुस्तकं वाचायची, कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा यामध्ये अचूकता हवी. नाही तर वेळ वाया जातो. एनसीईआरटी पुस्तकांकडे दुर्लक्ष हेही परीक्षा उत्तीर्ण न व्हायचं एक कारण आहे.

आताची परीक्षा पद्धत, प्रश्नांचा ट्रेंड्स समजून न घेणं

अनेकदा उमेदवार परीक्षेचं नवं पॅटर्न, प्रश्न याबद्दल परिचित नसतात. त्यांना हे सगळं माहीत हवं. यशस्वी परीक्षार्थींशी संपर्क हवा.

आईला भेटताच गहिवरले नरेंद्र मोदी

माॅक टेस्ट न देणं आणि विश्लेषण न करणं

गेल्या वर्षातली प्रश्नपत्रिका न सोडवणं हे सर्वात मोठ्या अपयशाचं कारण आहे. उमेदवारांनी परीक्षेची पद्धत, प्रश्नांचं स्वरूप, उत्तरं याचा नियमित अभ्यास करायला हवा. माॅक टेस्ट द्यायला हवी. आपल्या प्रगतीचं नेहमीचं विश्लेषण करायला हवं.

रिव्हिजन आणि प्रॅक्टिसची कमतरता

अनेक जण अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात. प्रॅक्टिसवर नाही. पूर्ण सिलॅबस रिव्हाइज करणंही आवश्यक आहे. परीक्षा पद्धतीनुसार प्रश्नांचा अभ्यास करायला हवा. फक्त वर्णनात्मक किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणं खूप मोठी चूक ठरू शकते.

SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?

First published: May 27, 2019, 2:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading