मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोकणात पाच तस्करांना केलं जेरबंद, खवले माजरांचा औषधासाठी वापर

कोकणात पाच तस्करांना केलं जेरबंद, खवले माजरांचा औषधासाठी वापर

या टोळ्यांकडून खवले मांजर घेउन ते आंतरराष्ट्रीय स्मगलरांकडे पाठवणारी एक टोळी सांगली जिल्ह्यात सक्रिय.

या टोळ्यांकडून खवले मांजर घेउन ते आंतरराष्ट्रीय स्मगलरांकडे पाठवणारी एक टोळी सांगली जिल्ह्यात सक्रिय.

या टोळ्यांकडून खवले मांजर घेउन ते आंतरराष्ट्रीय स्मगलरांकडे पाठवणारी एक टोळी सांगली जिल्ह्यात सक्रिय.

  सिंधुदुर्ग 15 जानेवारी :  खवले मांजराची तस्करी करणाऱ्या पाच जणाना सिंधुदुर्ग वनविभागाने जिवंत खवले मांजरासह पकडलय.पूर्ण वाढ झालेल्या  या खवले मांजराची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत चाळीस लाख रुपये असल्याचं म्हटलं जातय . हे खवले मांजर सिंधुदुर्गातून कोल्हापूरच्या दिशेने घेउन जात असताना आंबोली घाटाच्या पायथ्याशी सापळा रचून या पाचही जणाना अटक करण्यात आली . खवले मांजराच्या तस्करीची गेल्या दोन महिन्यातली  ही तिसरी घटना असल्यामुळे एक मोठी टोळी या तस्करीत कार्यरत असावी असा अंदाज असून पोलीस आणि वनविभाग याचा शोध घेतायत.

  का होते खवले मांजराची तस्करी ? 

  खवले मांजर हा कृमी किटक खाउन जगणारा पर्यावरण पुरक प्राणी आहे . या मांजराच्या अंगावरची खवले आणि रक्त  ही दुर्धर आजारांवर औषध म्हणून वापरली जातात असा समज आहे म्हणून या खवल्यांना चीन व्हिएतनाम यासारख्या देशात प्रचंड मागणी आहे. परंतू वैद्यक शास्त्रात या समजाला अद्याप कोणताही दुजोरा नाही . पण त्याहूनही भयंकर म्हणजे  खवले मांजराचा उपयोग काळी जादू करणारे तांत्रिक मांत्रिक करतात अशीही अंधश्रध्दा आहे . त्यामुळे या खवले मांजरांच्या तस्करीत खूप  वाढ होतेय.

  विक्रम गोखले म्हणाले, राष्ट्रवादीत एकाच नेत्याकडे 'व्हिजन', आणि तो म्हणजे...

  कोल्हापूर , रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अशा तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे. या टोळ्यांकडून खवले मांजर घेउन ते आंतरराष्ट्रीय स्मगलरांकडे पाठवणारी एक टोळी सांगली जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रानी दिलीय . या टोळीतला एकजण  आंतरराष्ट्रीय तस्करांशी व्हॉट्सॅप द्वारे संपर्कात असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्याना आढळल्यानंतर त्या इसमाचा शोध सुरु झालाय.

  छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही, भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

  कुठे आढळतं खवले मांजर ?

  कोकणातल्या दाट जंगलातल्या बहुतांश भागात खवले  मांजर आढळत असल्याच वनविभागाने म्हटलय . किडे आणि वाळवी खाउन जगणारा हा प्राणी सशाप्रमाणेच अत्यंत भित्ता असल्यामुळे या खवलेमांजराला अगदी सर्रासपणे जिवंत पकडलं जातं आणि त्याची विक्री केली जाते . त्यामुळेच वन्यजीव अधिसूचीत या प्राण्याला समाविष्ट करण्यात आलं असून वाघाप्रमाणेच या प्राण्याला महत्व देण्यात आलं आहे . जमिनीत खड्डा काढुन हे खवले मांजर राहतं आणि अत्यंत सावकाश हालचाली करतं  त्यामुळे या प्राण्याला पकडणं जंगक तस्कराना सोपं झालय.

  First published:
  top videos

   Tags: Pangolin