मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

होळीच्या आनंदात पसरली शोककळा, बसच्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, 34 जखमी

होळीच्या आनंदात पसरली शोककळा, बसच्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, 34 जखमी

प्रवाशांमध्ये होळीचा आनंद होता, अनेकांच्या घरात धुलीवंदनाची जोरदार तयारी सुरू होती

प्रवाशांमध्ये होळीचा आनंद होता, अनेकांच्या घरात धुलीवंदनाची जोरदार तयारी सुरू होती

प्रवाशांमध्ये होळीचा आनंद होता, अनेकांच्या घरात धुलीवंदनाची जोरदार तयारी सुरू होती

  • Published by:  Meenal Gangurde
चंबा, 10 मार्च : आज धुलीवंदनाच्या निमित्ताने घरांमध्ये रंगाची उधळण केली जात असताना काही घरांमध्ये दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात बसच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 34 जण जखमी आहेत. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिऴालेल्या माहितीनुसार, बस डेहराडूनहून चंदीगडच्या मार्गाने चंबा येथे जात होती. तेव्हाच एचआरटीसी (HRTC) बसचा चंबा पठानकोट मार्गावरील कांगू चेहलीजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील 34 जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज सकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. काल रात्रीपर्यंत या प्रवाशांच्या घरात होळीची जोरदार तयारी सुरू होती. आज तेथे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकजण आपल्या नातेवाईकांकडे होळी साजरी करण्यासाठी जात होते. तेथेच काळाने त्यांच्यावर घाला घातला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाही. बसचा अपघात झाल्यानंतर प्रवासी आरडाओरडा करू लागले. त्यांचा आवाज ऐकून जवळील गावातील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच सरकारी अधिकारी मदतीसाठी आले. पोलिसांक़डून या अपघाताचा तपास सुरू आहे. हे वाचा - बाईक नाही म्हणून गर्लफ्रेंडने मारला टोमणा, तिला इम्प्रेस करण्यासाठी त्याने...
First published:

Tags: Accident, Holi

पुढील बातम्या