ट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू

ट्रकची बसला जोरदार धडक, 5 जणांचा मृत्यू

ट्रकची धडक बसल्यानंतर बसमधील दहा प्रवासी जखमीही झाले आहेत. एटापल्लीहून आलापल्लीला जाणा-या बसला सुरजागडकडे लोहखनिज वाहतूक करण्यासाठी जाणा-या ट्रकने धडक दिली.

  • Share this:

गडचिरोली, 15 जानेवारी : गडचिरोलीत ट्रकची बसला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.

ट्रकची धडक बसल्यानंतर बसमधील दहा प्रवासी जखमीही झाले आहेत. एटापल्लीहून आलापल्लीला जाणा-या बसला सुरजागडकडे लोहखनिज वाहतूक करण्यासाठी जाणा-या ट्रकने धडक दिली.

अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना मदत केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. अपघात झालेल्या एटापल्ली गावातील लोक संतप्त झालेले पाहायला मिळाले.

Special Report : दुष्काळग्रस्त मराठवाड्याचं कटू वास्तव

First published: January 16, 2019, 12:11 PM IST

ताज्या बातम्या