महाराष्ट्र सरकारकडून दिलासादायक बातमी, 5 रुग्णांनी केली कोरोनावर मात

महाराष्ट्र सरकारकडून दिलासादायक बातमी, 5 रुग्णांनी केली कोरोनावर मात

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रग्ण बरे होत असून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : संपूर्ण देशभरात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्र सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना बरा होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 5 रग्ण बरे होत असून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यावर उपाय होत आहे ही बाब अत्यंत सकारात्मक आहे.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. मुंबई, पिंपरी आणि पुण्यात हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 52 पर्यंत पोहोचली आहे. तर यामुळे घाबरून न जाता काळजी घ्या, शक्य तितक्या वेळ घरी रागण्याचा प्रयत्न करा. आणि आरोग्यदायी रहा असं आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला दिलं आहे.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना अंतर्गत उपचार दिले जातात, पेशन्ट खर्च आर्थिक ताण वाढणार नाही.

- 1036 पेशंटची तपासणी केली आहे, त्यात लक्षण आढळलेल प्ंशनट ट्रॅव्हल असून तपासणी नंतर 971 निगेटीव्ह आले

- वर्ल्ड हेल्थ ओर्गनाझेशन गाईड लाईन पाळले जातात

- राज्यात कोरोना उपचार करणारे डाॅक्टर मानवतेच काम करतात ते कौतुकास्पद आहे.

- रत्नागिरी केस - सिव्हील सर्जन यांनी रिपोर्ट पाठवला का नाही हे तपासले जाईल

- पीएम यांनी देशास आवाहन केले. देशात जनता कर्फू म्हटले. योग्य निर्णय शंभर टक्के प्रतिसाद दिला पाहिजे, जनतेनी सहभाग घेतला पाहिजे

- मुंबई गर्दी कमी व्हावे यासाठी सीएम आणि मी दुपारी 12.30 वा. फेसबुक लाईव्ह महत्वाचे निर्णय घेतले जातील.

- दररोज तीन लॅब टेस्ट करत होतो आणि येत्या दोन दिवसात आठ होईल आणि पुढील दहा दिवसात 12 पर्यंत लॅब टेस्ट यासाठी उपलब्ध होतील.

- 2400 सॅम्पल सध्या तपासले जात आहेत

- आज पीएम यांच्या समवेत आरोग्य मंत्री आणि सीएम संवाद व्हीडीओ काॅन्फरन्स करणार आहेत. राज्यात काय अपेक्षा केंद्र सरकारकडून टेस्ट लॅब, किटस याबाबत काही मागणी राज्य सरकार करेल

- मंुबईत परदेशात पर्यटन, विद्यार्थी, बिझनेस यासाठी गेलेत त्यांना आता परत आणणे ही समस्या थोडी झाली. केंद्र सरकार यांच्याशी संवाद करून त्याबाबत तोडगा काढला जाईल, त्यांची टेस्ट केली जाईल त्यानंतर सोडले जाईल.

First published: March 20, 2020, 11:29 AM IST

ताज्या बातम्या