कोकणातले मच्छिमार संकटात, काय आहेत कारणं?

कोकणातले मच्छिमार संकटात, काय आहेत कारणं?

मासळीवर वापरण्यात येणाऱ्या फॉर्मेलीन केमिकलमुळे गोवा सरकारने सहा महिन्यांसाठी परराज्यातील मासळी घेणे बंद केलय .

  • Share this:

दिनेश केळुसकर, ता.15 नोव्हेंबर : मासळीवर वापरण्यात येणाऱ्या फॉर्मेलीन केमिकलमुळे गोवा सरकारने सहा महिन्यांसाठी परराज्यातील मासळी घेणे बंद केलय . त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरीतले मच्छीमार संकटात आलेयत .


गोव्यात मासळी ताजी दिसण्यासाठी फॉर्मेलीन चा वापर होत असल्याचं आढळल्यानं गोवा सरकारनं परराज्यातली मासळी इन्सुलेटेड वाहनातूनच आणण्याचे निर्बंध घातले . मात्र ही अट मासळी व्यापाऱ्यानी पाळली नसल्यामुळे गोवा सरकारने सहा महिन्यांसाठी मासळी आयातीवर बंदी घातलीय . त्यामुळं गोव्यात मासळी पाठवणारे सिंधुदुर्गातील मच्छीमार संकटात आलेत.


छोट्या मच्छीमाराना इन्सुलेटेड वाहनातून मासळी नेणं आर्थिक दृष्ट्या परवडणारं नसल्यामुळं ही अट शिथिल करावी अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यानी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना केली . मात्र ही मागणी धुडकावत विश्वजित राणे यानी सहा महिने ही बंदी कायम राहणार असल्याचं सांगितलय .


यातून पळवाट काढण्यासाठी गोव्याच्या लक्झरी बसेस मधून पाठवण्यात येणाऱ्या मासळीवर सिंधुदुर्ग पोलीसांनी कारवाई सुरु केलीय. तर गोव्यातल्या मासळी व्यापाऱ्यांच्या गाड्याही सिंधुदुर्गात फिरकू देणार नसल्याचा इशारा मच्छीमारांनी दिलाय .

VIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 06:16 PM IST

ताज्या बातम्या