स्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली

स्विस बँकेत 'तो' काळा पैसा नाही-अरुण जेटली

अरुण जेटली यांनी फेसबुकवर एक ब्लाॅग लिहून स्विस बँकेच्या प्रकरणावर खुलासा केलाय.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जून : स्विस बँकेत मागील चार वर्षात भारतीयांचे 50 टक्के पैसे वाढले असल्याची बाबसमोर आलीये. विरोधकांनी यावरून गदारोळ उठवलाय. मात्र, स्विस बँकेत असलेला पैसा हा काळा पैसा नाही, ज्या भारतीयांचा पैसा बँकेत आहे त्यात भारतीय निवासी आहेत असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.

अरुण जेटली यांनी फेसबुकवर एक ब्लाॅग लिहून स्विस बँकेच्या प्रकरणावर खुलासा केलाय. स्विस बँकेत 50 टक्के पैसे वाढल्यामुळे नोटबंदी फेल गेली असा दावा त्यांनी खोडून काढला.

स्विस बँकेत ज्यांनी पैसे ठेवले आहे त्याची माहिती मिळवण्यास कोणतीही सुविधा नव्हती. पण वाढत्या दबावामुळे बँकेनं तशी तयारी दाखवली. आता ज्या देशांनी माहिती मागितली ती दिली जात आहे अशी माहिती जेटली यांनी दिली. जानेवारी 2019 पासून भारताला अशा खात्यांची माहिती मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही पुढील वर्षांपासून काळ्या पैशाची माहिती मिळण्यास सुरुवात होणार आहे असं सांगितलं होतं. त्यांचं हे वक्तव्य स्विस बँकेत 7000 कोटी जमा असल्याच्या माहितीनंतर आलंय.

हेही वाचा

विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

 VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

 काश्मीरमध्ये 'सुपर 500' महिला कमांडो रोखणार दगडफेक !

 

First published: June 29, 2018, 11:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading