Home /News /news /

शरद पवारांना पहिल्यांदाच ऐवढं रागवलेलं पाहिलं, पार्थच्या आत्याची प्रतिकिया

शरद पवारांना पहिल्यांदाच ऐवढं रागवलेलं पाहिलं, पार्थच्या आत्याची प्रतिकिया

शरद पवार यांना पहिल्यांदाच अशा कठोर शब्दात रागावताना पाहिलं असल्याची प्रतिक्रिया पार्थच्या कोल्हापूरमधील आत्या विजया पाटील यांनी दिली आहे.

    मुंबई, 14 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजनिकरित्या केलेल्या आक्रमक टीकेची महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले होते. यावर पार्थनेही आक्रमक भूमिका घेतल्याचं समोर आलं. पण शरद पवार यांना पहिल्यांदाच अशा कठोर शब्दात रागावताना पाहिलं असल्याची प्रतिक्रिया पार्थच्या कोल्हापूरमधील आत्या विजया पाटील यांनी दिली आहे. शरद पवारांना मी लहानपणापासून पाहत आहे. ते आज राजकारणातले मोठे दिग्गज आहेत. पण त्यांना मी पहिल्यांदाच अशा कठोर भाषेत बोलताना पाहिल्यांचं विजया पाटील म्हणाल्या. दरम्यान, यावेळी पार्थ हा खूप हळवा आहे. त्याला त्याची भूमिका मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. पण तो हे सगळं लवकरच विसरेन असंही विजया यांनी एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यावर रोहित पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावरून पवार कुटुंबात 'All is Not Well' असं चित्र दिसत आहे. हा आमच्या फॅमिलीचा विषय आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत. पवार कुटुंबात All is Not Well...! रोहितनं दिली पहिली प्रतिक्रिया 'हा फॅमिली विषय आहे. त्यावर साहेब बोलले आहेत. आपण फॅमिली विषयावर बोलण्यापेक्षा सुशांतला न्याय मिळायला हवा यावर भाजप राजकारण करतं आहे.' अशी प्रतिक्रिया रोहिप पवार यांनी दिली आहे. पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर भाजप राजकारण करत असल्याचं टीका रोहित पवार यांनी केली आहे. संजय राऊत आता WHO वर घसरले; 'Coronavirus चा प्रसार WHO च्या नादाला लागल्यामुळेच! यावेळी, कुटुंबात सुरू असलेल्या वादावर पवार साहेब बोलतील आणि निर्णय घेतील असं म्हणत अधिक माहिती देण्याचं रोहित पवारांनी टाळलं. दरम्यान, पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं. पण हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पवार कुटुंबाची उद्या महत्त्वाची बैठक, कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी शेवटचा प्रयत्न सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीत एकत्र भेटणार असल्याची माहिती मिळते आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Ajit pawar, Lockdown, NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या