सांगलीत पहिल्यांदा भाजपच्या महापौर, जाणून घ्या कोण आहेत संगीता खोत

सांगलीत पहिल्यांदा भाजपच्या महापौर, जाणून घ्या कोण आहेत संगीता खोत

  • Share this:

सांगली, 20 ऑगस्ट : सांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीत खोत यांची निवड झालीय. हात उंचावून झालेल्या मतदानात संगीता खोत यांना 42 मतं मिळालीत तर काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवाराला 35 मतं पडल्याने संगीता खोत यांचा 7 मतांनी विजय झाला. त्यामुळे आता सांगली महापालिकेत महापौर आणि उपमहापौर हे भाजपचेच असणार आहे. महापौर संगीता खोत तर उपमहापौर धीरज सूर्यवंशी निवडूण आले आहेत.

महापौर पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून वर्षा अमर निंबाळकर याना 35 मते पडली, तर भाजप कडून संगीत खोत याना 42 मते पडली. उपमहापौर पदासाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी 42 मते पडली तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून स्वाती पारधी 35 मते पडली.

शिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता ?

यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे एक मात्र नगरसेवक आणि माजी उपमहापौर विजय घाडगे यांनी कोणालाच मतदान केले नाही. ते तटस्थ राहिले. दरम्यान, सांगली महानगरपालिकेत दिवंगत पूर्व मंत्री पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला असलेलं सांगली देखील भाजपने हिसकावून घेतलं. सांगलीमध्ये 78 जागांपैकी भाजपने 41 जागांवर विजय मिळवला. तर युती असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 35 जागा पटकावल्या. अपक्षांच्या खात्यात 2 जागा आल्या. शिवसेनेनं सांगलीत खातही उघडलं नाही.

तसा या निवडणुकांचा अर्थ स्पष्ट होता. सांगली आणि जळगावमध्ये भाजपचा झेंडा फडकला होता. त्यामुळे शिवसेना भाजपासून वेगळी होऊनही काही खास खेळू शकलेली नव्हती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील अवस्थाच आहे. या निवडणुकांमुळे भाजप 100 टक्के त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचलं. एकीकडे याचा शिवसेनेला चांगलाच धडा मिळाला असेल तर दुसरी फडणवीसांची गादी आणखी पक्की झाली असं म्हणायला हरकत नाही.

कोण आहेत महापौर संगीता खोत ?

- संगीता विठ्ठलराव खोत

- 1998 नगरसेविका, सां.मि.कु. महापालिका

- 1999 सदस्या, स्थायी समिती

- 2000 सभापती, महिला व बालकल्याण समिती

- 2008 नगरसेविका, सां.मि.कु. महापालिका

- 2013 नगरसेविका, सां.मि.कु. महापालिका

- 2015-16 सभापती, सां.मि.कु. महापालिका

- 2018 नगरसेविका, सां.मि.कु. महापालिका

अमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल

First published: August 20, 2018, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading