S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'विरानुष्का'चं मुंबईत शाही रिसेप्शन ; क्रिकेटर, सेलिब्रिटींची हजेरी

मुंबईत सेंट रेजिस या पंचतारांकित हाॅटेलमध्ये रिसेप्शन सुरू झालंय. या रिसेप्शनला बाॅलिवूडसह टीम इंडियाचे खेळाडू हजर झाले आहे.

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2017 10:49 PM IST

'विरानुष्का'चं मुंबईत शाही रिसेप्शन ; क्रिकेटर, सेलिब्रिटींची हजेरी

26 डिसेंबर : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर भारतात परतले दिल्ली शाही रिसेप्शननंतर मुंबईतही रिसेप्शन सुरू झालंय. मुंबईत सेंट रेजिस या पंचतारांकित हाॅटेलमध्ये रिसेप्शन सुरू झालंय. या रिसेप्शनला बाॅलिवूडसह टीम इंडियाचे खेळाडू हजर झाले आहे.

मुंबईतील सेंट रेजिस पंचतांकित हाॅटेलमध्ये रिसेप्शनला सुरुवात झालीये. या रिसेप्शनला अनुष्काने सब्यसाची ने डिझाईन केलेला गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केलाय. तरी विराटने इंडो- वेस्टर्न पॅटर्नमधील वेल्वेटचा कुर्ता आणि सिल्क पजामा परिधान केलाय.

या रिसेप्शनला माजी क्रिकेटर संदीप पाटील आपल्या परिवारसह हजर झाले. आतापर्यंत सुनील गावस्कर, विरेंद्र सेहवाग, आर अश्विन, चेतेश्‍वर पुजारा, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव पोहोचले आहे. तसंच सायना नेहवालही पोहोचली आहे.  विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी आपल्या परिवारसह उपस्थित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 10:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close