Home /News /news /

VIDEO : मुंबईतल्या पहिल्या Corona रुग्णाची अवस्था कशी होती? नर्सनं सांगितला अनुभव

VIDEO : मुंबईतल्या पहिल्या Corona रुग्णाची अवस्था कशी होती? नर्सनं सांगितला अनुभव

मुंबईतील रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी आणि उपचार करणाऱ्या नर्सने तिचा एक अनुभव शेअर केला आहे.

    मुंबई, 30 मार्च : जगभर कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे. भारतात कोरोना व्हायरसचे एक हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यासोबत मुंबईत आहेत. दिवसेंदिवस वाढत चालेला आकडा काळजी करायला लावणारा आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली देण्यात आल्या आहेत. इतकच नाही तर सरकारसोबत नर्स आणि डॉक्टर डोळ्यात तेल घालून अहोरात्र काम करत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर मुंबईत कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 47 नवे रुग्ण आढळून आले असून आता मुंबईतील रुग्णांची संख्या 170वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी आणि उपचार करणाऱ्या नर्सने तिचा एक अनुभव शेअर केला आहे. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' (Humans of Bombay) या फेसबुक पेजवर संवाद साधताना तिने मुंबईतील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण रुग्णालयात आला तेव्हा काय परिस्थिती होती. त्या रुग्णाची काय अवस्था होती हे सर्व नेटकऱ्यांसोबत शेअर केलं आहे. ''काही दिवस मला माझे पती रुग्णालयात सोडायला यायचे. त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोक्याची शक्यता होती. त्यामुळे मी त्यांना सोबत न येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही सर्व नर्स मिळून कार करायचं ठरवलं पण नंतर कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही रुग्णालयातच राहण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात राहाणे म्हणजे एखाद्या वॉर रुममध्ये राहण्यासारखं होतं. त्यात खूप मोठी जोखीम होती. मला आजही आठवतं कोरोनाचा पहिला रुग्ण जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा तो फार घाबरलेला आणि गोंधळलेल्या अवस्थेत होता. त्याची ही अवस्था पाहून आम्हालाही एका क्षणासाठी भीती वाटली. त्या दिवशी तर आम्हाला जराही उसंत मिळाली नव्हती. जेव्हा जेव्हा रुग्णालयात कोरोनाची टेस्ट करायला लोक यायाची आणि ती टेस्ट निगेटीव्ह यायची तेव्हा रुग्णापेक्षा जास्त आनंद डॉक्टर आणि नर्सच्या चेहऱ्यावर असायचा.'' कोरोनाचं संक्रमण आणि संसर्ग टाळण्यासाठी या नर्सनं नागरिकांना आवाहन केलं आहे. सरकारनं दिलेल्या सूचनांचं गांभीर्यानं पालन करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा कोरोनासोबत लढण्याचा हा एकमेव पर्याय आहे. आपल्या आरोग्याची आणि घराची स्वच्छता राखा. विनाकारण घराबाहेर, गर्दीच्या ठिकाणी जावू नका. ह्या महासंकटाचा सामना करण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. हे संकट दूर झाल्यानंतर आपण सर्वजण मिळून सेलिब्रेट करू असं या नर्सनं आवाहन केलं आहे. नर्सनं शेअर केलेल्या या अनुभवाला आतापर्यंत 29 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. 2.2 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत तर चार हजार लोकांनी शेअर केला आहे. हे वाचा : अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी पायपीट
    First published:

    पुढील बातम्या