मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फॉरेन्सिक कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेहापासून व्हायरसची लागण झाल्याचा संशय

फॉरेन्सिक कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू, मृतदेहापासून व्हायरसची लागण झाल्याचा संशय

थायलँडमध्ये (Thailand) एका फॉरेन्सिक कर्मचाऱ्याचा (forensic professional) कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

थायलँडमध्ये (Thailand) एका फॉरेन्सिक कर्मचाऱ्याचा (forensic professional) कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

थायलँडमध्ये (Thailand) एका फॉरेन्सिक कर्मचाऱ्याचा (forensic professional) कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
बँकॉक, 14 एप्रिल : कोरोनाव्हायरस (coronavirus) रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यावर उपचार करणारे अनेक डॉक्टर, नर्सना व्हायरसची लागण झाली आहे. मात्र आता या रुग्णांच्या थेट संपर्कात न येणा-या फॉरेन्सिक कर्मचाऱ्यालाही (forensic professional) या व्हायरसची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला आहे, Buzz feed news ने याबाबत वृत्त दिलं आहे. थायलँडमधील (Thailand) हे प्रकरण आहे आणि कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या मृतदेहामुळे या फॉरेन्सिक कर्मचाऱ्यालाही व्हायरसची लागण झाली असावी, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लिगल मेडिसीनमध्ये (Journal of Forensic and Legal Medicine) हे प्रकरण प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार फॉरेन्सिक मेडिसीन युनिटच्या वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाव्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. थायलंडमध्ये सध्या कोरोनाचे बहुतेक रुग्ण इतर देशातून आलेले आहेत आणि कोरोनाचा कम्युनिटी प्रसार अगदी कमी आहे. तर फॉरेन्सिक मेडिसीनमधील कर्मचाऱ्यांचा कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येण्याची शक्यता कमी आहे, मात्र बायोलॉजिकल सँपल आणि मृतदेहाशी त्यांचा संपर्क येतो, असं या जर्नलमध्ये म्हटलं आहे. जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग याबाबत माहिती देणारे बँकॉकच्या RVT मेडिकल सेंटरचे वॉन स्रिविजीतलाय आणि चीनच्या हैनान मेडिकल युनिव्हर्सिटीचे विरोज विवानित्कीत म्हणाले, "फॉरेन्सिक कर्मचा-यांनीही आवश्यक ती खबरदारी घ्यावी. त्यांनीही कोरोनाव्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विशेष असा ड्रेस घालण्याची गरज आहे. ऑपरेशन रूमप्रमाणेच फॉरेन्सिक युनिट, पॅथॉलॉजीमध्येही डिसइन्फेक्शन प्रक्रिया केली जावी" CoronaVirus नेमका आहे तरी कसा? 5 महिन्यात उलगडलेली विषाणूची रहस्यं न्यूज 18 लोकमतशी बोलताना महाराष्ट्र IMA चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "कोरोना विषाणूच्या संसर्गाने आजार होऊन मृत्यू पावणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. मृतदेहामध्ये कोरोनाव्हायरस किती काळ राहतो याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. आजमितीला रुग्ण मृत्यू पावल्यावर त्यापासून विषाणूंचा संसर्ग इतरांना होतो किंवा नाही, याबद्दल खात्रीपूर्वक माहिती नाही. यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार मृतदेह हाताळताना आणि अंत्यविधी करताना आवश्यक ती काळजी घ्यावी." संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

पुढील बातम्या