मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही'; नवरीच्या पाठवणीनंतर सुरू झाला खूनी खेळ

'तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही'; नवरीच्या पाठवणीनंतर सुरू झाला खूनी खेळ

ही भयावह घटना कोणत्याही बॉलिवूडमधील चित्रपटापेक्षा कमी नाही.

ही भयावह घटना कोणत्याही बॉलिवूडमधील चित्रपटापेक्षा कमी नाही.

ही भयावह घटना कोणत्याही बॉलिवूडमधील चित्रपटापेक्षा कमी नाही.

रोहतक, 2 डिसेंबर : हरयाणातील (Haryana News) रोहतकमधून एक अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. ही घटना कोणत्याही बॉलिवूडमधील चित्रपटापेक्षा कमी नाही. लग्नानंतर नवरी आपल्या सासरी जात होती, त्या दरम्यान एका माथेफिरू प्रियकराने भररस्त्यात आपल्या साथीदारांसह मिळून गोळीबार केला. या माथेफिरूने आधी नवरीची गाडी ओव्हरटेक केली आणि त्यानंतर भररस्त्यात गोळीबार केला.

नवरा-नवरी देतायेत मृत्यूशी झुंज...

ही घटना रोहतक जिल्ह्यातील भाली या गावी बुधवारी रात्री 12 वाजता घडली. साहिल नावाचा हा तरूण आपल्या साथीदारांसह नवरा-नवरीच्या गाडीचा पाठलाग करीत होता. प्रथम हल्लेखोरांनी नवरा-नवरीची गाडी थांबवली आणि दोघांवर गोळ्या झाडल्या. यानंतर जखमी नवरीला पीजीआय रोहतकमधील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पाठवणीवेळी नवरीच्या मागे लागले होते गुंड..

घटनेची सूचना मिळताच गुरुवारी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. सांगितलं जात आहे की, या गोळीबार करणारा तरुण नवरीचा पहिला प्रियकर असून त्याचं नाव साहिल आहे. त्याने साथीदारांसह मिळून गोळीबार केला. तपासात समोर आलं आहे की, हे गुंड नवरीच्या कारचा पाठलाग करीत होते. नवरी आपल्या सासरच्या गावाजवळ पोहोचतात त्यांनी हल्ला केला. इनोव्हा कारमधून हे तीन गुंड आले होते, त्यांनी ओव्हरटेक करून गाडी थांबवली.

हे ही वाचा-अजब प्रकार! पत्नीच्या माहेरच्यांनी लग्नात दिलेलं साहित्य घेण्यास पतीचा नकार

संपूर्ण गावात दहशत पसरली..

आरोपीने हल्ला करण्यापूर्वी नवरीला घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. ज्यानंतर स्थानिक लोक तेथे जमा झाले. या घटनेनंतर गावात दहशत पसरली आहे. गावकरी येताच गुंड फरार झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल करीत पोलीस तपास करीत आहे.

First published:

Tags: Haryana, Marriage