दिल्लीत पुन्हा वातावरण तापलं, जामिया मिलिया इस्लामियाच्या गेट नंबर 5वर गोळीबार

दिल्लीत पुन्हा वातावरण तापलं, जामिया मिलिया इस्लामियाच्या गेट नंबर 5वर गोळीबार

गोळीबाराची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामियाबाहेर लोक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. दुसरीकडे जामियाच्या विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : दिल्लीच्या (Delhi) जामिया परिसरामध्ये पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या (Jamia Millia Islamia University) गेट नंबर -5 जवळ रविवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. स्कूटीवरील दोन संशयितांनी गोळीबार केल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच पदयात्रेच्या वेळी गोळीबार झाल्याची घटना घडली ज्यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला. त्यात पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, जामिया समन्वय समितीने (जेसीसी) सांगितले की, जामिया मिलिया इस्लामियाच्या गेट नंबर -5 जवळ दोन अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर जामिया नगर पोलीस ठाण्यातून विद्यार्थी परत आले.

गोळीबाराची माहिती मिळताच जामिया मिलिया इस्लामियाबाहेर लोक जमा झाले आणि त्यांनी निदर्शने केली. दुसरीकडे जामियाच्या विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. एसीपी जगदीश यादव म्हणाले की, ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याआधारे आयपीसीच्या कलम 307 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 27 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पथक घटनास्थळी पोहोचले आहे, गेट क्रमांक 5 आणि 7 मधील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येईल. पुढील तपशील समोर येईल, त्यास एफआयआरमध्ये समाविष्ट करून कारवाई केली जाईल.

शाहीन बाग आणि जामियामध्ये झाला होता गोळीबार

दक्षिण पूर्व दिल्लीत पडणार्‍या जामिया व शाहीन बाग भागात नुकताच गोळीबार झाला होता. शनिवारी शाहीन बागेत एका 25 वर्षीय व्यक्तीने हवेत दोन गोळ्या झाडल्या, ज्याला नंतर ताब्यात घेण्यात आले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी जामियाच्या बाहेरूनही एका युवकाला गोळ्या घालण्याची घटना घडली होती. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला होता.

गोळाबाराच्या घटनेनंतर DCP चिन्मय बिस्वाल यांना हटवले

निवडणूक आयोगाने रविवारी DCP(साउथ ईस्ट दिल्ली)चिन्मय बिस्वालला त्वरित परिणाम म्हणून सध्याच्या पदापासून मुक्त करण्यात आले. चिन्मय बिस्वाल आता गृहमंत्रालयाला अहवाल देतील. प्राप्त माहितीनुसार, शाहीन बागच्या सद्यस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. चिन्मय बिस्वाल यांच्या जागी निवडणूक आयोगाने अतिरिक्त डीसीपी कुमार ज्ञानेश यांना पदभार सोपवला आहे.

First published: February 3, 2020, 6:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या