S M L

पुण्यात 24 तासात दुसरी आगीची घटना, बाणेरमध्ये आगडोंब

पुण्यातील बाणेर भागातील कपिल क्लासिक इमारतीत असलेल्या आय टी कंपनीत आज दुपारी अचानक आग लागली. आगीत आय टी कंपनीचा तिसरा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2017 07:15 PM IST

पुण्यात 24 तासात दुसरी आगीची घटना, बाणेरमध्ये आगडोंब

 28 मार्च : पुण्यातील बाणेर भागातील कपिल क्लासिक इमारतीत असलेल्या आय टी कंपनीत आज दुपारी अचानक आग लागली. आगीत आय टी कंपनीचा तिसरा मजला संपूर्णपणे जळून खाक झाला. अग्निशमन विभाग वेळेवर पोहचल्याने आग लवकर आटोक्यात येऊन मोठी वित्त आणि जीवितहानी टळली. मात्र आग नेमकी कशा मुळे लागली हे अजून समजू शकलं नाही.

पुण्यात काल रात्रीपासून पाषाण-बाणेर भागात आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या असून सुदैवाने जखमी किंवा जीवितहानीचे वृत्त नाही. काल रात्री नॅशनल केमिकल लॅबोरटरी, पाषाण येथे प्रयोगशाळेची एक मजली इमारत पुर्णपणे जळून खाक झाली. आज दुपारी दोन वाजता बाणेर भागात बँक ऑफ महाराष्ट्र बँकेशेजारी एका कमर्शियल बिल्डिंगमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजला पूर्ण जळून खाक झाला. याठिकाणी व्हॅल्यू वोटस नाव असलेले आय.टी.पार्कचे कार्यालय आणि साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटातच आग आटोक्यात आणल्याने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीची झळ पोहचू शकली नाही. आज गुढीपाडव्याची सुट्टी असल्याने कोणीही कर्मचारी बिल्डिंगमध्ये नव्हतं. अग्निशमन दलाच्या 2 फायरगाड्या आणि 3 वॉटर टँकरच्या मदतीने आग विझवली. सदर कामगिरी अग्निशमन दलाच्या पाषाण, औंध आणि मुख्यालयातील अधिकारी व जवानांनी चोखपणे बजावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2017 07:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close