मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

56 तासांपासून धुमसतोय मुंबईतला सिटी मॉल, अग्निशमन दलाचे 6 जवान जखमी

56 तासांपासून धुमसतोय मुंबईतला सिटी मॉल, अग्निशमन दलाचे 6 जवान जखमी

 दुकानात मोबाईल फोनच्या बॅटरी, चार्जर आणि वायर सारख्या अनेक ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग धुमसत होती.

दुकानात मोबाईल फोनच्या बॅटरी, चार्जर आणि वायर सारख्या अनेक ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग धुमसत होती.

दुकानात मोबाईल फोनच्या बॅटरी, चार्जर आणि वायर सारख्या अनेक ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग धुमसत होती.

    मुंबई, 25 ऑक्टोबर : मुंबईच्या सेंट्रल मॉलमध्ये लागलेल्या आगीवर तब्बल दोन दिवसांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दक्षिण मुंबईतील मॉलमध्ये लागलेली आग अखेर रविवारी पहाटेपर्यंत विझविण्यात आली. 56 तासांपासून धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. मॉलमधील अनेक साहित्य जळून खाक झालं आहे. दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकल्यानं संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. दुकानात मोबाईल फोनच्या बॅटरी, चार्जर आणि वायर सारख्या अनेक ज्वलनशील वस्तू असल्याने ही आग धुमसत होती. सध्या अग्निशमन दलाकडून इथे कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ही आग एवढी प्रचंड होती की आगीने सगळंच भस्मसात करून टाकलं.मॉलच्या आतमध्ये काहीही शिल्लक राहिलेली नाही. सर्व 4 मजली मॉल जळून खाक झाला असून कोट्यवधींचं नुकसान झालं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे वाचा-‘पोलिसांवर हात उचलण्याची हिंम्मत होतेच कशी, त्यांना धड शिकवा’ राऊतांचा हल्लाबोल हा गर्दीचा भाग असल्याने आणि मॉलला फारसे रस्ते नसल्याने अग्निशमन दलालाही आटोक्यात आणण्यासाठी कठिण परिश्रम करावे लागले.गुरुवारी रात्री उशिरा ही आग लागली. मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे.आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रमेश चौगुले किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ऑर्किड टॉवर या जवळच्या इमारतीमधून साधारण 3500 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या