मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील सिने विस्टा स्टुडिओला आग !

मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील सिने विस्टा स्टुडिओला आग !

कांजूरमार्ग मधील गांधीनगर परिसरात सिने विस्टा स्टुडिओला आग लागलीय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या स्टुडिओमध्ये बेपनहाँ मालिकेचं शुटिंग सुरू होतं.

  • Share this:

06 जानेवारी, मुंबई : कांजूरमार्ग मधील गांधीनगर परिसरात सिने विस्टा स्टुडिओला आग लागलीय. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या स्टुडिओमध्ये बेपनहाँ मालिकेचं शुटिंग सुरू होतं. या मालिकेत अनेक बालकलाकार काम करत होती. यासर्वांना आता तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

कांजूरमार्गमधील पवई टेलिफोन ऑफिससमोर हा सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओत प्रामुख्याने हिंदी मालिकांचे शूटिंग चालतं. तसंच जुन्या थीमचा सेटही या स्टुडिओत उभारण्यात आला होता. या स्टुडिओत कुणी अडकलं आहे का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

First published: January 6, 2018, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading