कधीही आई होणार नाही कविता कौशिक, जाणून घ्या कारण

कधीही आई होणार नाही कविता कौशिक, जाणून घ्या कारण

FIR मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली कविता सध्या अनेक पंजाबी सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आता लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर तिला बाळाबद्दल सगळेच विचारत आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 मे- टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने दोन वर्षांपूर्वी तिने प्रियकर रोनित बिसवासशी केदारनाथमध्ये जाऊन लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतरही दोघांमधलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. कविता सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. ती रोनितसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. FIR मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली कविता सध्या अनेक पंजाबी सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आता लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर तिला बाळाबद्दल सगळेच विचारत आहेत. पण यावर तिचं उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय...

Happy Mother's Day 2019: या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे आईसोबतचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?
 

View this post on Instagram
 

When ur awesome n u know it ❤️ Hair and make up - One and only Asif !!! @bagwati_19 bag No time to click better pics


A post shared by Kavita (@ikavitakaushik) on

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना कविता कौशिकने हे स्पष्ट केलं की तिला कधीच आई व्हायचं नाहीये. तिने हा निर्णय एकटीने घेतला नसून रोनित बिसवासचीही याला संमत्ती आहे. कविता म्हणाली की, ‘मला त्या लहान मुलासोबत अन्याय करायचा नाहीये. जर मी वयाच्या ४० व्या वर्षी आई होते तर तो २० वर्षांचा होईपर्यंत मी म्हातारी झाले असेन. मला नाही वाटत की वयाच्या २० व्या वर्षी माझ्या मुलावर अपरिहार्यपणे आई- बापाला सांभाळण्याची जबाबदारी पडेल.’

लग्नाआधीच गरोदर राहिली अक्षय कुमारची 'हिरोईन'

कविता पुढे म्हणाली की, ‘आधीच लोकसंख्या वाढलेल्या या जगात त्याला आणावं आणि मुंबईत त्याला गर्दीचा एक भाग करून सोडून द्यावं. रोनित लहान असतानाच त्याच्या आई- वडिलांचं निधन झालं. मी एकुलती एक असल्यामुळे माझ्या घरच्याचा सांभाळ करण्यासाठी मला फार मेहनत घ्यावी लागली.’
VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला

‘सध्या आम्ही आमचं आयुष्य एखाद्या लहान मुलासारखं एन्जॉय करत आहोत. एकमेकांच्या मदतीने आम्ही अनेक स्वप्न पूर्ण करत आहोत. अनेकदा मी त्याची बाप होते तर तो माझी आई होतो. आम्ही आयुष्यातील त्या रिक्त जागा भरतोय ज्या काही कारणांमुळे मोकळ्या राहिल्या होत्या. त्यामुळे आम्हाला बाळाची कमतरता जाणवत नाही. याशिवाय राजस्थानमधील एका गावात माझ्या वडिलांनी ज्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती त्यांचीही जबाबदारी घेतली आहे. आम्ही आमच्या परिने त्यांना मदत करतो.’

'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2019 11:40 AM IST

ताज्या बातम्या